राष्ट्रवादीने साजरी केली जल्लोषात शिवजयंती

Chhatrapati Shivaji Maharaj - NCP

ठाणे (प्रतिनिधी) : “तुमचे आमचे नाते काय; जय जिजाऊ, जय शिवराय” अशा घोषणा देत ठाणे शहरात राष्ट्रवादी काँग्रेसने प्रचंड जल्लोषात छत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्साहात साजरी केली. राष्ट्रवादी काँग्रेस कार्यालय आणि मासुंदा तलाव येथे शहराध्यक्ष आनंद परांजपे, राष्ट्रवादीचे प्रदेश चिटणीस तथा ज्येष्ठ नगरसेवक सुहास देसाई , महिला अध्यक्ष सौ. सुजाताताई घाग आणि महिला कार्याध्यक्षा सौ. सुरेखा ताई पाटील यांच्या हस्ते शिवरायांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करण्यात आला.

छत्रपती शिवाजी महाराज जयंती सोहळ्याचे ठाणे राष्ट्रवादी काँग्रेस कार्यालयामध्ये आयोजन करण्यात आले होते. यावेळी शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते. या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांच्या अर्धकृती पुतळ्याला पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले. त्यानंतर सर्व कार्यकर्त्यांनी शहराध्यक्ष आनंद परांजपे यांच्या नेतृत्वाखाली मासुंदा तलाव येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुर्णाकृती पुतळ्याला अभिवादन केले.

यावेळी युवक अध्यक्ष मोहसिन शेख, कार्याध्यक्ष संदेश पाटील, युवती अध्यक्षा प्रियांका सोनार, विद्यार्धी अध्यक्ष प्रफुल्ल कांबळे सेवादल अध्यक्ष बाळकृष्ण कामत, सामाजिक न्याय विभाग अध्यक्ष कैलास हावळे, जेष्ठ नगराक सेल रामदास खोसे, हॉकर्स सेल अध्यक्ष सचिन पंधरे, लिगल सेल अध्यक्ष अँड. विनोद उतेकर, व्यापारी सेल अध्यक्ष दीपक क्षत्रिय, असंघटीत कामगार सेल राजू चापले, जिल्हा सरचिटणीस श्री प्रभाकर सावंत, विधानसभा अध्यक्ष नितीन पाटील, विधानसभा कार्याध्यक्ष महेंद पवार, विक्रांत घाग, शहर कार्यकारीणी संदिप जाधव, सचिन खुसपे, दिलिप नाईक. अजित सावंत, सुहास कुलकर्णी, ब्लॉक अध्यक्ष निलेश कदम, समिर पेंढारे, रत्नेश दुबे, निलेश फडतरे, दत्तात्राय जाधव, ब्लॉक कार्यध्यक्ष प्रदिप झाला, वार्ड अध्यक्ष सुमित गुप्ता, साई प्रभु, दिनेश दळवी, विेवेक गोडबोले, किशोर चव्हाण, अनिल वजले, फिरोज पठाण, महाराष्ट्र प्रदेश सचिव शशिकला पुजारी, भानुमती पाटील, स्मिता पारकर, वंदना हुंडारे, वंदना लांडगे, शुभांगी कोळपकर, पुजा जाधव, सुरेखा शिंदे, संगीता शेळके, नलिनी सोनावणे, मंजु येरुणकर, ज्योती चव्हाण, अनुश्री देशमुक, सिधूताई रणदिवे, सुमन गवारे, युवक विधानसभा अध्यक्ष दिपक पाटील, उपाध्यक्ष शहर श्रीकांत टावरे, संकेत नारणे, ब्लॉक अध्यक्ष संदिप पवार, रोहित भंडारी आदी कार्यकर्ते उपस्थित होते.