दिल्ली; राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवारांना १ हजार मतही नाही मिळाली!

मुंबई : दिल्लीत भाजपाचा पराभव झाल्याबद्दल राष्ट्रवादी काँग्रेसचे स्वतः जिंकल्याच्या तोऱ्यात बोलत आहेत. शरद पवार म्हणाले – भाजपा हरणारच होता, मला आश्चर्य वाटले नाही. भाजपाची पराभवाची मालिका सुरू झाली आहे ती थांबणार नाही. दुसरे नेते नबाब मलिक म्हणाले – दिल्लीतील जनतेने भाजपाला देशद्रोही जाहीर केले. पण, या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवाराला जास्तीत जास्त ९०४ मतं मिळाली. त्याबद्दल ते काही बोलत नाहीत.

या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे पाच उमेदवार उभे होते. त्यापैकी दिल्ली काँटेन्मेन्ट मतदार संघातून उभे असलेले सुरेन्द्र सिंह यांना सर्वात जास्त म्हणजे ९०४ मत मिळाली तर बाबलपूर मतदार संघातील उमेदवार झाहीद अली यांना सर्वात कमी म्हणजे फक्त १०० मतं मिळाली. यात दिल्लीच्या मतदारांनी राष्ट्रवादी काँग्रेसची काय किंमत केली हे त्यांचे नेते सांगत नाहीत.

या संदर्भात उल्लेखनीय आहे की काही दिवसांपूर्वी आप चे आमदार फतेह सिंह व सुरेन्द्र सिंह यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला त्यावेळी त्यांचे पक्षात स्वागत करताना जयंत पाटील म्हणाले होते की, अब दिल्ली दूर नहीं !