राष्ट्रवादी काँग्रेसचा मोठा निर्णय ; कोरोनाच्या पार्श्वभूमीवर दोन आठवड्यांसाठी जनता दरबार स्थगित

NCP Cancel Janta Darbar

मुंबई : राज्यात कोरोनाचे (Corona) संकट वाढण्यास सुरुवात झाली आहे . या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने पुढच्या दोन आठवड्यांसाठी जनता दरबार स्थगित केला आहे. विशेष म्हणजे काल (१९ फेब्रुवारी) दिवसभरात राष्ट्रवादी काँग्रेसच्या तीन बड्या नेत्यांना कोरोनाची लागण झाल्याची माहिती समोर आली. यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) प्रदेशाध्यक्ष आणि राज्याचे जलसंपदामंत्री जयंत पाटील (Jayant Patil), राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे (Rajesh Tope) आणि खान्देशातील राष्ट्रवादीचे बडे नेते एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांना कोरोनाची लागण झाल्याची माहिती समोर आली .

याअगोदर राष्ट्रवादीच्या बड्या नेत्यांना कोरोनाची लागण झाल्याची माहिती समोर आली आहे. कोरोनाची बाधा झाल्यास रुग्णाला प्रचंड त्रासाला सामोरं जावं लागतं. या भीषण संकटाची जाणीव ठेवून राष्ट्रवादीने जनता दरबार पुढच्या दोन आठवड्यांसाठी स्थगित केला आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER