पवारांच्या सूचनेचं राष्ट्रवादीच्या मंत्रिमंडळाकडून पालन, आजपासून सुरूवात

Sharad Pawar

मुंबई : मोठ्याप्रमाणात पसरत असलेल्या कोरोना विषाणूला (Coronavirus) रोखण्यासाठी मार्चपासून राज्यात लॉकडाऊन सुरु आहे. जूनपासून लॉकडाऊनच्या (Lockdown) नियमात शिथीलता आणण्यात आली. आता तर ई पासही बंद करण्यात आले आहेत. त्यामुळे नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे. लॉकडाऊनमध्ये नागरिकांसह राजकीय नेते मंडळींना सुद्धा दौरे करण्यास अडचणी येत होत्या. त्यामुळे नागरिकांच्या समस्या सोडवण्यासाठी नेत्यांना अडचणी येत होत्या. मात्र, आता लॉकडाऊनमध्ये शिथीलता आली असल्याने राजकीय पक्ष कामाला लागले आहेत. सर्वसामान्य नागरिकांच्या सोयीसाठी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pawar) यांच्या सूचनेनुसार राष्ट्रवादीचे मंत्री दर बुधवारी ‘जनता दरबार’ घेणार आहे.

देशात कोरोना विषाणूने धुमाकुळ घातला आहे. लॉकडाऊनमुळे राजकीय पक्षांनाही जनतेची कामे करण्यावर मर्यादा आल्या होत्या. मात्र, लॉकडाऊनमध्ये शिथीलता आणल्याने राजकीय पक्ष देखील कामाला लागले आहेत. नागरिकांच्या समस्या सोडवण्यासाठी ते पुढे येत आहेत. राष्ट्रवादीचे मंत्री शरद पवार यांच्या सूचनेनुसार मुंबईतील प्रदेश कार्यालयात कार्यकर्त्याच्या भेटी घेणार आहेत. प्रत्येक मंत्र्यांना वेगवेगळा वेळ ठरवून देण्यात आला आहे. त्या वेळेत हे मंत्री सर्वसामान्य नागरिकांना, कार्यकर्त्यांना भेटणार आहेत. दर बुधवारी हा जनता दरबार होणार असल्याची माहिती राष्ट्रवादीच्या फेसबुक वॉलवरुन देण्यात आली आहे.

उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) व आरोग्यमंत्री राजेश टोपे (Rajesh Tope) हे सकाळी १० ते दुपारी १२ या वेळेत कार्यकर्त्यांच्या भेटीसाठी उपस्थित असणार आहेत. याशिवाय सोलापूरचे पालकमंत्री दत्तात्रय भरणे हे दुपारी २ ते ४ या वेळेत उपस्थित राहणार आहेत. राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे व मंत्री आदिती तटकर हे ४ ते ६ या वेळेत असणार आहेत. यावेळी हे सर्व मंत्री जनतेच्या तक्रारी ऐकून सोडवण्याचा प्रयत्न करणार आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER