राष्ट्रवादी -भाजपचे बडे नेते सांगली दौऱ्यावर; कोणत्या पक्षाला मिळणार महापौरपद ?

Chandrakant Patil - Jayant Patil

मुंबई : महापौर आणि उपमहापौर निवडणूक जाहीर झाल्यानंतर अनेक पक्षांनी कंबर कसली आहे . महापौर गीता सुतार (Geeta Sutar) यांची मुदत 21 फेब्रुवारी रोजी संपणार आहे. महापौर पद खुले असल्याने इचुकांची संख्या वाढली आहे. सांगली महापालिकेत भाजपची एक हाती सत्ता आहे भाजपचे संख्याबळ अपक्ष धरून 43 आहेत. तर विरोधी पक्ष काँग्रेसचे 19 तर राष्ट्रवादीचे 15 सदस्य आहेत.

सत्ताधारी भाजपकडून स्वाती शिंदे, युवराज बावडेकर, धिरज सूर्यवंशी, निरंजन आवटी यांची नावे चर्चेत आहेत. भाजपमध्ये इच्छुकांची संख्या ज्यास्त असल्यामुळे खुद्द भाजप प्रदेश अध्यक्ष चंद्रकांत पाटील यांना येउन या ठिकाणी निर्णय घ्यावा लागत आहे. तर राष्ट्रवादीकडून मेनुद्दीन बागवान, दिग्विजय सुर्यवंशी, काँग्रेसकडून उत्तम साखळकर, मंगेश चव्हाण हे इच्छुक आहेत. त्यामुळे भाजपचे वरिष्ठ नेते नेमके कोणाला महापौर पदाची संधी देतात याकडे सर्वांचे लक्ष लावले आहे.

महापौर निवडणूक कार्यक्रम जाहीर झाल्यानंतर भाजप आणि विरोधी काँग्रेस (Congress) आणि राष्ट्रवादीमध्ये हालचाली गतिमान झाल्या आहेत. भाजपचे (BJP) प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) आणि राष्ट्रवादीचे (NCP) प्रदेशाध्यक्ष मंत्री जयंत पाटील (Jayant Patil) हे येत्या रविवारी सांगली दौऱ्यावर असणार आहेत. भाजप आणि राष्ट्रवादी – काँगेसच्या स्वतंत्र बैठकादेखील यावेळी पार पडणार असल्याची माहिती देण्यात आली आहे. या बैठकांमध्ये महापौर उमेदवारीवर निर्णय होण्याची शक्यता आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER