धनंजय मुंडेंची गच्छंती, राजेश टोपे नवे संपर्कप्रमुख ; औरंगाबाद पालिकेसाठी राष्ट्रवादीचा मोठा निर्णय

Rajesh-tope- Dhananjay-Munde

मुंबई : औरंगाबाद महापालिका निवडणुकीच्या (Aurangabad municipal corporation elections) तोंडावर राष्ट्रवादीने मोठा निर्णय घेतला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसने जिल्ह्यात पक्षात मोठे फेरबदल केले आहेत. राष्ट्रवादीकडून आरोग्यमंत्री राजेश टोपे (Rajesh Tope) यांची औरंगाबादच्या संपर्क प्रमुखपदी नियुक्ती करण्यात आली आहे.

औरंगाबाद जिल्ह्याच्या संपर्क प्रमुख पदावरून धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांची गच्छंती होऊन त्यांच्याऐवजी औरंगाबादच्या संपर्क प्रमुखपदी रादेश टोपे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

आरोग्यमंत्री म्हणून राजेश टोपे यांनी कोरोना काळात चांगली कामगिरी केली आहे. जनमानसात त्यांची चांगली छबी तयार झाली आहे. त्यांच्या कामाचा आणि छबीचा औरंगाबाद महापालिकेत राष्ट्रवादीला फायदा व्हावा, यासाठी पक्षाने हे महत्त्वपूर्ण पाऊल उचलल्याची चर्चा आहे. त्यामुळे महापालिकेच्या संपूर्ण निवडणूक प्रचार तसेच कार्यक्रमाची जबाबदारी राजेश टोपे यांच्या खांद्यावर सोपवली गेली आहे. औरंगाबाद पालिका निवडणुकीत राष्ट्रवादीला घवघवीत यश मिळवून देण्याची मोठी जबाबदारी टोपे यांच्यावर असणार आहे.

दरम्यान आतापर्यंत मराठवाड्यातील नेते म्हणून धनंजय मुंडे यांच्यावर मराठवाड्यातील निवडणुकीची सगळी जबाबदारी असयाची हे विशेष .

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER