शरद पवारांचा क्रांतिकारी निर्णय ; राष्ट्रवादी ठरला एलजीबीटी सेल सुरू करणारा पहिलाच पक्ष

NCP became the first party to launch an LGBT cell.jpg

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pawar) पुरोगामी महाराष्ट्राच्या राजकारणात गेल्या काही दशकांपासून सत्तेत व विरोधी अशा दोन्ही भूमिकांमध्ये महत्वाची कामगिरी बजावली आहे . याच पार्श्वभूमीवर पवारांनी क्रांतिकारी निर्णय घेतला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसने (NCP) पक्षाचा एलजीबीटी सेल (LGBT cell) सुरू करण्याचा निर्णय घेतला असून, एलजीबीटी समुदायाचा पक्षातंर्गत सेल करणारा राष्ट्रवादी पहिलाच पक्ष ठरला आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे विविध समुदायासाठी अनेक सेल आहेत. यात आता भर टाकत राष्ट्रवादी पक्षाने एलजीबीटी सेल सुरू करण्याचा निश्चित केले आहे. राजकीय पक्षाचे समाजातील वेगवेगळ्या घटकांसाठी स्वतंत्र सेल कार्यरत असतात. या सेलच्या माध्यमातून त्या समुदायापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न राजकीय पक्षांकडून होतो. त्यामाध्यमातून समस्या जाणून निराकरण करण्याचा प्रयत्नही केला जातो.

राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या सूचनेनुसार पक्षाच्या विविध सेलमध्ये एल.जी.बी.टी. हा नवीन सेल सुरू करण्यात आला आहे. एलजीबीटी समुदायला मुख्य प्रवाहात आणण्यासाठी राष्ट्रवादीनं हा सेल सुरू केला असून, आज (५ ऑक्टोबर) दुपारी १२.३० वा. राष्ट्रवादी काँग्रेसच्या मुंबई येथील प्रदेश कार्यालयात प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या हस्ते व खासदार सुप्रिया सुळे यांच्या उपस्थितीत या सेलच्या पदाधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात येणार आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजलाMT LIKE OUR PAGE FOOTER