विमानतळ, रेल्वे विकून बैलगाडी खरेदी करायचा प्लॅन आहे का? राष्ट्रवादीचा सवाल

ncp-Majid Memon ask-question-modi-government

मुंबई : राष्ट्रवादीचे माजी खासदार माजिद मेमन (Majid Memon) यांनी केंद्रावर निशाणा साधला आहे. अभिनेता सुशांत सिंग राजपूत प्रकरण (Sushant Singh Rajput case) आणि सरकारी संस्थांचे खासगीकरण यावरून मेमन यांनी मोदी सरकारला (Modi Govt) खडेबोल सुनावले आहे .

माजिद मेमन यांनी ट्विटमध्ये म्हटले की, एअरपोर्ट, रेल्वे यांचे खासगीकरण केले जात आहे. केंद्र सरकार बैलगाडी खरेदी करण्याचा प्लॅन करत आहे का? जे लोक सध्या सत्तेत आहेत त्यांना देशाला पुन्हा मागे घेऊन जायचं आहे.

:

पैशाच्या बळावर त्यांना सुट्या एन्जॉय करायच्या आहेत. सुशांत राजपूत, रिया आणि कंगना या सगळ्यातून बाहेर पडा, आसपास आणखी गंभीर समस्या आहेत त्याकडे लक्ष द्या, अशा शब्दांत  मोदी सरकारवर ताशेरे ओढले .तसेच ज्या कोणाला मुंबई, महाराष्ट्र POK सारखा वाटत असेल, तसेच तालिबान राज्य चाललं आहे असं वाटतंय त्यांनी स्वत:हून अशा धोकादायक ठिकाणाहून लांब गेलं  पाहिजे. भाजप अशा लोकांना प्रोत्साहन देत आहे आणि जनतेच्या पैशातून त्यांना सुरक्षा देत आहेत, असे त्यांनी अभिनेत्री कंगना रणौतलाही फटकारले आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजलाMT LIKE OUR PAGE FOOTER