निवडणूक अधिकाऱ्यांसमोरच राष्ट्रवादी आणि शिवसेनेच्या कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी

NCP - Shiv Sena

ठाणे : राज्यात ग्रामपंचायत निवडणुकीच्या (Gram Panchayat Elections) रणधुमाळीला सुरुवात झाली आहे. ठिकठिकाणी गावात वाद होऊ नये म्हणून बिनविरोध निवडणुकीवर भर दिला जात आहे. पण भिवंडी तालुक्यातील ५६ ग्रामपंचायतींच्या  निवडणुकांना राड्याने सुरुवात झाली आहे. निवडणूक अधिकाऱ्यांच्या समोरच सत्ताधारी असलेल्या राष्ट्रवादी आणि शिवसेनेच्या (Shiv Sena) कार्यकर्त्यांमध्ये तुफान हाणामारी झाली.

भिवंडी तालुक्यातील भादवड येथील निवडणूक कार्यालयात निंबवली गावातील राष्ट्रवादी (NCP) आणि सेनेचे उमेदवार समोर येताच निवडणुकीच्या वादातून दोघांचा चांगलाच राडा झाला. निवडणूक कार्यालयात दोन्ही कार्यकर्त्यांमध्ये जोरदार बाचाबाची झाली. त्यानंतर बाचाबाचीचे रूपांतर हाणामारीत झाले. निवडणूक अधिकाऱ्यांसमोरच दोन्ही कार्यकर्त्यांनी एकमेकांना मारहाण केली. एवढंच नाही तर एकमेकांवर खुर्च्याही भिरकावल्या.

गणेश गुळवी आणि प्रवीण गुळवी अशी दोघांची नावं आहेत. दोघांना एकच चिन्ह आल्यामुळे दोघांमध्ये वाद पेटला होता. त्यानंतर रूपांतर हाणामारीत झाले. विशेष म्हणजे, हे दोघेही नातेवाईक असून एकाच कुटुंबातील आहेत. ग्रामपंचायत निवडणूक सुरू झाल्यापासून ही चौथी घटना आहे. पहिली घटना गुंदवली इथं चौघांना मारहाण झाली होती.  त्यानंतर काल्हेरचे शिवसेनेचे शाखाप्रमुख यांच्यावर गोळीबार करण्यात आला होता. तर खारबाव इथं उमेदवाराची कार जाळण्याचा प्रयत्न करण्यात आला होता.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER