अर्थव्यवस्थेवरून लक्ष वळवण्यासाठीच कंगना प्रकरण : अमोल कोल्हे

Amol Kolhe-Kangana Ranaut

मुंबई : शिवसेना नेते खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांना प्रत्युत्तर देताना अभिनेत्री कंगना रणौत (Kangana Ranaut) हिनं मुंबईची तुलना पाकव्याप्त काश्मीरशी केली होती. या वक्त्यव्यानंतर चांगलाच वाद निर्माण झाला आहे . या वादावर आता राष्ट्रवादीचे खासदार अमोल कोल्हे (Amol Kolhe) यांनी भाष्य केले .

देशाच्या कोलमडलेल्या अर्थव्यवस्थेवरून लक्ष वळवण्यासाठीच कंगना प्रकरणाला हवा दिली जात आहे, असा आरोप कोल्हे यांनी केला आहे. कलाकारांनी सामाजिक भान जपले पाहिजे, असा सल्लाही त्यांनी यावेळी दिला आहे. ते एका वृत्तवाहिनीशी बोलत होते .

एखाद्या व्यक्तीला किती महत्त्व द्यायचं हे ठरवलं पाहिजे. कलाकारांनीही कोणत्याही गोष्टीवर भाष्य करताना सामाजिक भान जपलं पाहिजे, असं सांगतानाच देशात रोज हजारो केसेस सापडत आहेत. त्याचंही सर्वांनी भान राखलं पाहिजे, असेही कोल्हे म्हणाले .

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजलाMT LIKE OUR PAGE FOOTER