औरंगाबादचे संभाजीनगर करण्याला राष्ट्रवादीचाही विरोध, पक्षाने स्पष्ट केली भूमिका

Nawab Malik

मुंबई :- औरंगाबाद महापालिका निवडणुकीपूर्वीच शहराच्या नामांतरणावरून राजकारण तापू लागले आहे. औरंगाबाद शहराचं संभाजीनगर असं नामकरण करण्यात यावं, अशी आग्रही भूमिका शिवसेनेने घेतली आहे. मात्र, या नामांतराला सत्ताधारी पक्षातील काँग्रेसचा विरोध आहे. नामांतराबाबत आतापर्यंत फक्त शिवसेना (Shivsena) आणि काँग्रेसची भूमिका समोर आली होती. मात्र, आता राष्ट्रवादीचीदेखील भूमिका समोर आली आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना पक्षाची भूमिका स्पष्ट केली. औरंगाबाद (Aurangabad) शहराचं नामकरण हा महाविकास आघाडी (Mahavikas Aghadi) सरकारच्या अजेंडावरील विषय नाही. त्यामुळे प्रश्नच येत नाही, अशी प्रतिक्रिया देत त्यांनी एकप्रकारे नामांतराला विरोध केला आहे.

दरम्यान, नवाब मलिक (Nawab Malik) यांनी शिवसेना नेते संजय राऊत यांच्या पत्नी वर्षा राऊत, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे, शिवसेना आमदार प्रताप सरनाईक (Pratap Saranaik) यांना ईडीने नोटीस देण्यावरुन केंद्र सरकारवर निशाणा साधला. केंद्र सरकारचा ईडीचा वापर करुन दबाव आणण्याचा प्रयत्न यशस्वी होणार नाही, अशी रोखठोक भूमिका त्यांनी मांडली.

वर्षा राऊत किंवा इतर राजकीय व्यक्ती असतील त्यांना समन्स आले असतील तर चौकशीलसा सामोरं जावं लागेल. समोर जाणं म्हणजे काही चूक केली असं होत नाही. ते त्यांची भूमिका स्पष्ट करतील. ईडीचा वापर केंद्र सरकार करते हे आता उघड झालेले आहे. मात्र ही पद्धत योग्य नाही. केंद्र सरकार अशा यंत्रणांचा वापर करून दबाव आणण्याचा प्रयत्न करत असेल तर तो यशस्वी होणार नाही, असं नवाब मलिक म्हणाले.

ही बातमी पण वाचा : शिवसेनाप्रमुखांनी 30 वर्षांपूर्वीच औरंगाबादचं नाव संभाजीनगर केलंय, त्यावर फक्त सही शिक्का उमटायचा – राऊत

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER