
मुंबई : साताऱ्याचे आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले (Shivendra Raje Bhosale) यांनी रविवारी बारामतीत उपमुख्यमंत्री अजित पवार(Ajit Pawar) यांची भेट घेतली. या भेटीमुळे राजकीय वर्तुळात चर्चा रंगली होती. अजित पवार यांनी यावर उत्तर दिले असून विरोधकांना टोला लगावला आहे. ते पुण्यात पत्रकारांशी बोलत होते . विरोधी पक्षातील अनेक नेते मंडळी आपल्याला भेटत आहेत. त्यावरून अनेक राजकीय चर्चा होत आहेत, असा प्रश्न विचारला असता अजित पवार म्हणाले की, मला काल शिवेंद्रसिंहराजे भेटले, आज परिचारक भेटले.
हे जरी वेगळ्या राजकीय पक्षात असले तरी मी महाराष्ट्र राज्याचा उपमुख्यमंत्री आहे. सोलापूर जिल्ह्याचे एक शिष्टमंडळ आले होते . त्यामध्ये शहाजी बापू, दीपक साळुंके असे अनेक मान्यवर आले होते. सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री दत्तात्रेय मामा भरणे यांनी आज वेळ घेतली होती. त्यांचे काही पाण्याबाबत प्रश्न आहेत.
त्यामुळे ते आले होते. शेवटी आम्हीदेखील विरोधी पक्षामध्ये असताना आमच्या कामांसाठी पालकमंत्री गिरीश बापट यांना भेटत होतो. आम्ही संबंधित मंत्री किंवा मुख्यमंत्र्यांना भेटायचो. ही परंपरा आजची नाही, तर शंकरराव चव्हाण साहेबांपासून चालत आलेली आहे. त्याला काही वेगळं स्वरूप देण्याचं कारण नाही, असे अजित पवार यांनी सांगितले. ज्यावेळी काय करायचे ते जाहीरपणे सांगितले जाईल. आता अमुक अमुक त्या त्या पक्षात येतायत, मग वाजवा किती वाजवायचे ते, असे अजित पवार यांनी म्हणताच एकच हशा पिकला.
ही बातमी पण वाचा : कुणाला किती मुलं होती, कुणाचं लग्न झाले , काय लपवाछपवी केलीय हे सांगू का?अजितदादांचे खडेबोल
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला