‘देश का गद्दार’ अशा घोषणा देत अर्णव गोस्वामींच्या अटकेसाठी राष्ट्रवादीचे आंदोलन

मुंबई :- देश का गद्दार, अटक करा अटक करा, गली गली में चोर है अर्णव गोस्वामी चोर है… अशा घोषणा देत राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या (NCP) कार्यकर्त्यांनी अर्णव गोस्वामी (Arnav Goswami) यांच्या मुंबईतील रिपब्लिक टीव्हीच्या कार्यालयाबाहेर आंदोलन केले.

देशाची गोपनीय माहिती देणा-याचे नाव जाहीर करावे व अर्णव गोस्वामी यांना अटक करावी, यासाठी राष्ट्रवादीने हे आंदोलन केले.

अर्णव गोस्वामींना  जी गोपनीय माहिती मिळाली ती चॅनलचा टीआरपी वाढवण्यासाठीचा त्याचा उपयोग केला.  या गंभीर आरोपाखाली गोस्वामींना तत्काळ अटक करण्यात यावी, अशी मागणी माजी आमदार विद्याताई चव्हाण यांनी केली. तर, अर्णव गोस्वामी यांना ही गोपनीय माहिती कुणी पुरवली त्याचे नाव जाहीर करावे, अशी मागणी प्रवक्ते महेश तपासे यांनी केली आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER