एनसीबीकडून दीपिका पदुकोण, श्रद्धा कपूर, सारा, रकुल यांना समन्स!

Heroines

मुंबई :- बॉलिवूड ड्रग्ज कनेक्शन प्रकरणी एनसीबीने बड्या बॉलिवूड अभिनेत्रींना बोलावणे धाडले आहे. अभिनेत्री दीपिका पदुकोण (Deepika Padukone), सारा अली खान (Sara Ali Khan), श्रद्धा कपूर  (Shraddha Kapoor) आणि रकुल प्रीत (Rakul Preet) सिंगला नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोने समन्स बजावले आहे. पुढील तीन दिवसात चौघींची चौकशी होणार आहे.

श्रुती मोदी, रकुल प्रीत सिंग आणि फॅशन डिझायनर सिमॉन खंबाटा यांना उद्या (२४ सप्टेंबर) चौकशीसाठी बोलावले आहे. दीपिकाला शुक्रवार २५ सप्टेंबर, तर श्रद्धा कपूर आणि सारा अली खान यांना शनिवार २६ सप्टेंबरला हजर राहण्याचे आदेश आहेत. दीपिका सध्या गोव्यात दिग्दर्शक करण जोहरच्या एका चित्रपटात काम करत आहे. या चित्रपटाचं गोव्यात चित्रीकरण सुरु आहे. मात्र, एनसीबीने समन्स बजावल्यानंतर दीपिकाने तातडीने चित्रीकरण थांबवलं. दीपिकाची सध्या १२ वकिलांसोबत सल्लामसलत सुरु आहे.

एनसीबीच्या हाती पुरावे लागल्याने या अभिनेत्रींना समन्स बजावण्यात आले आहेत. तत्पूर्वी, एनसीबीने मंगळवारी क्वान या टॅलेंट कंपनीचे सीईओ ध्रुव चितगोपेकर, टॅलेंट मॅनेजर जया साहा आणि सुशांतची मॅनेजर राहिलेल्या श्रुती मोदीची सुमारे सहा तास चौकशी केली. यावेळी 15 बॉलिवूड सेलिब्रिटींची नावे समोर आल्याचे सांगण्यात येत आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER