नारायण राणेंच्या वक्तव्यांची एनसीबी चौकशी झाली पाहिजे; अर्जुन खोतकर

Narayan Rane & arjun khotkar

मुंबई : शिवसेनेच्या (Shivsena) दसरा मेळाव्यात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी राणे कुटुंबीयांवर टीका केली होती. आज त्या टीकेला उत्तर देताना नारायण राणे (Narayan Rane) यांनी उद्धव ठाकरेंवर आरोप केलेत. याची एनसीबीने चौकशी केली पाहिजे, अशी मागणी शिवसेनेचे नेते अर्जून खोतकर (Arjun Khotkar) यांनी केली.

एका वृत्तवाहिनीशी बोलताना ते म्हणाले, राणे मुख्यमंत्र्यांबाबत शेलक्या भाषेत, एकेरी बोलले. चुका योग्य पद्धतीने मांडा, लक्षात आणून द्या. त्यांनी कोणत्या पुराव्यांच्या आधारावर अशाप्रकारे भाषण केले याची एनसीबीने चौकशी केली पाहिजे.

आपण काय बोलतो याचं भान नारायण राणे यांनी ठेवले पाहिजे. राणे ज्या संस्कृतीत वाढले त्यांच्याकडून दुसरी अपेक्षा काय करणार? ते अशाच पद्धतीने बोलतात. संपूर्ण महाराष्ट्राला त्याची कल्पना आहे. ते आणि त्यांचे मुल कुणाचीही लायकी काढणे, पाडून बोलने यामध्ये धन्यता मानतात, असे खोतकर म्हणालेत.

पत्र परिषदेत उद्धव ठाकरे याना इशारा देताना नारायण राणे म्हणाले, बाळासाहेबांमुळे आतापर्यंत शांत आहे. दादागिरी केलीत तर ‘मातोश्री’च्या आतल आणि बाहेरच सगळं बाहेर काढेन. उद्धव ठाकरेंना जनाची नाही तर मनाची वाटली पाहिजे. हा माणूस मुख्यमंत्री पदाला लायक नाही.

उद्धव ठाकरेंची टीका

राज्यात काही जणांना इंजेक्शन देणे गरजेचे असते ते आम्ही देतो. बेडक कितीही फुगले तरीही वाघ होत नाहीत, तुम्हाला माहिती आहे. एक बेडूक आणि त्याची दोन पोरं या पक्षातून त्या पक्षात उड्या मारतात. आपण गोष्टीत बेडकीने बैल पाहिला हे ऐकले असेल. पण या बेडकाच्या पिल्लांनी वाघ पाहिला. त्यानंतर ही पिल्ले आपल्या वडिलांकडे गेली. तेव्हा मोठ्या बेडकाने ओरडायचा प्रयत्न केला. पण त्याचा आवाज आता चिरका झाला, अशी टीका उद्धव ठाकरे यांनी केली होती.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER