रिया चक्रवर्तीच्या घरात एनसीबीची झाडाझडती, अटक होण्याची शक्यता

Rhea Chakraborty - NCB Raid

मुंबई : अभिनेता सुशांतसिंह राजपूत (Sushant Singh Rajput) मृत्यू प्रकरणी केंद्रीय अमली पदार्थविरोधी पथकाने (एनसीबी) (NCB) रिया चक्रवर्तीच्या (Rhea Chakraborty) मुंबईतील घरावर छापा टाकला आहे. एनसीबीची टीम सकाळी साडे सहा वाजण्याच्या सुमारास रियाच्या घरी दाखल झाली. शोविक आणि रियाचे ड्रग्ज विषयी चॅट समोर आल्यानंतर नार्कोटिक्स विभागाची एका टीमनं रियाच्या घरी छापा टाकला आहे. मुंबई पोलीस देखील एनसीबी टीमसोबत रियाच्या घरी तपास करत आहेत. तर दुसरी टीम सॅम्युल मिरांडाच्या घरी दाखल झाली असून त्याला चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आलं आहे. एनसीबीकडून आज रियाला अटक होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

सॅम्युल मिरांडाविरोधात एनसीबी टीमकडे पुरावे असल्यानं त्याला चौकशीसाठी ताब्यात घेतलं आहे. तर रिया आणि शोविकला अटक होणार का? हे पाहाणं आता महत्त्वाचं ठरणार आहे. सध्या दोन्ही ठिकाणी एनसीबीकडून सर्च ऑपरेशन सुरू आहे.

रियाचा भाऊ शोविक चक्रवर्तीचे ड्रग्ज तस्करांशी संबंध उघड झाले असूनरिया-शोविकचे ड्रग्जप्रकरणात चॅट एनसीबीच्या हाती लागले आहे. त्यामुळे या दृष्टीने झडती सुरू आहे. ड्रग्जप्रकरणात आतापर्यंत चार जणांना अटक करण्यात आली आहे. झैद, बासित, अब्बास आणि करण अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER