एनसीबीचा अभिनेता अर्जुन रामपालच्या घरी छापा

Arjun Rampal NCB

मुंबई : बॉलिवूड ड्रग्ज रॅकेट प्रकरणी एनसीबीकडून अभिनेता अर्जुन रामपालच्याघरी (Arjun Rampal) छापा टाकण्यात आला आहे. तसेच या कारवाई दरम्यान अर्जुन रामपालच्या वाहनचालकाला ताब्यात घेण्यात आल्याची माहिती एएनआय या वृत्तसंस्थेने दिली आहे.

अभिनेता सुशांत सिंह राजपूत (Sushant Singh Rajput) याच्या आत्महत्येनंतर बॉलिवूडमधील ड्रग्ज रॅकेटचा पर्दाफाश झाला होता. तेव्हापासून एनसीबीकडून बॉलिवूडमधील ड्रग्ज रॅकेटची पाळेमुळे खोदण्याचे काम सुरु आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, आजच्या कारवाईत बॉलिवूडमधील अनेक बडे दिग्दर्शक आणि निर्मात्यांच्या घर आणि कार्यालयांवर छापे टाकण्यात आले आहेत. शनिवारी रात्रीपासूनच या कारवाईला सुरुवात झाल्याची माहिती पुढे येत आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER