नवाब मलिकांच्या जावयाविरोधात एनसीबीला मिळाले ठोस पुरावे; १८ जानेवारीपर्यंत न्यायालयीन कोठडी

Nawab Malik

मुंबई : राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते, अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक (Nawab Malik) यांचे जावई ड्रग्ज प्रकरणात नाव आल्याने चांगलेच अडचणीत आले आहेत. आता तर पोलिसांना त्यांच्याविरोधात ठोस पुरावेदेखील सापडले आहेत. एनसीबीने समीर खान यांच्या अटकेनंतर गुरुवारी सकाळी त्यांच्या वांद्रे येथील घर आणि कार्यालयावर छापेमारी केली. या कारवाईत एनसीबीला समीर खान यांच्या विरोधात ठोस पुरावे सापडले असून न्यायालयाने त्यांना १८ जानेवारीपर्यंत एनसीबी  (NCB) कोठडी सुनावली आहे.

एनसीबीने गेल्या आठवड्यात ब्रिटनमधील अनिवासी भारतीय नागरिक आंतरराष्ट्रीय ड्रग्ज डिलर करण सजनानी यांच्यासह फर्निचरवाला बहिणींकडून २०० किलोचो ड्रग्ज जप्त केले होते. त्यांच्या चौकशीतून केम्प्स कॉर्नर येथील प्रसिद्ध मुच्छड पानवाला दुकानाचा मालक राजकुमार तिवारी यालाही एनसीबीने ड्रग्ज कनेक्शन प्रकरणात अटक केली. त्यानंतर एनसीबीने नवाब मलिक यांचे जावई समीर खानला चौकशीसाठी बोलावले. तब्बल १० तास चौकशी केल्यानंतर त्यांना अटक केली.

दरम्यान, सजनानी याच्याशी झालेल्या आर्थिक व्यवहाराची तपासणी करताना एनसीबीला समीर खान याने  स्वतः ड्रग्ज घेतल्याचे पुरावे मिळाले आहेत. याबाबत एनसीबीचे विभागीय संचालक समीर वानखेडे यांनी माहिती दिली. तसेच, समीर खानविरोधात आणखी काही ठोस पुरावे मिळण्याची दाट शक्यता वर्तवण्यात येत आहे. याच प्रकरणी वांद्रेमधून एकाला ताब्यात घेतले असून त्याची चौकशी सुरू असल्याचे एनसीबीने सांगितले आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER