एनसीबी ड्रग्स तस्करांना वाचवून मुंबईच्या फिल्म इंडस्ट्रीला बदनाम करतोय – नवाब मलिक

Nawab Malik

मुंबई :- ड्रग्ज कनेक्शन (Drugs) प्रकरणी एनसीबी (NCB) अधिकाऱ्यांनी भारती सिंग आणि तिचा पती हर्ष लिंबाचिया यांना अटक केली होती. कोर्टासमोर हजर केले असता दोघांनाही ४ डिसेंबरपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. यावरून राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते आणि महाराष्ट्राचे मंत्री नवाब मलिक (Nawab Malik) यांनी ड्रग प्रकरणात एनसीबीच्या कार्यपद्धतीवर शंका व्यक्त केली आहे. विभाग ड्रग तस्करांवर कारवाई का करीत नाही, असा सवाल त्यांनी केला आहे. यामुळे अमली पदार्थ तस्करांना संरक्षण आहे काय? असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला आहे.

वृत्तसंस्था एएनआयशी बोलताना नवाब मलिक म्हणाले, ‘मादक पदार्थांचे सेवन करणार्‍यांना नारकोटिक्स कंट्रोल ब्युरो अटक करत आहे. ते ड्रग व्यसनी आहेत, त्यांना तुरूंगात, पुनर्वसन केंद्रात पाठवू नये. अंमली पदार्थ तस्करांचा पाठलाग करणे हे एनसीबीचे कर्तव्य आहे, परंतु त्यांच्यावर कोणतीही कारवाई केली जात नाही. फिल्म इंडस्ट्रीतील ड्रग यूजर्सना अटक करुन एनसीबी ड्रग तस्करांना संरक्षण देत आहे? असा सवाल त्यांनी केला.

ते पुढे म्हणाले, ‘सिस्टममध्ये काहीतरी गडबड आहे. ड्रग कोठून येत आहेत हे त्यांनी पहावे. ड्रग स्मगलर आणि पॅडलर कोण होते? त्यांच्यावर कोणतीही कारवाई होत नाही. असा आरोपही मलिक यांनी केला.

ही बातमी पण वाचा : ड्रग्ज : भारती आणि हर्ष लिंबाचियाला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER