एनसीबीकडून बिग बॉस ७ फेम अजाज खानला अटक

Maharashtra Today

मुंबई :- नारकोटिक्स कंट्रल ब्यूरो म्हणजे एनसीबीला मोठं यश मिळालं आहे. बिग बॉस ७ फेम अजाज खानला (Ajaz Khan) अमली पदार्थाच्या एका प्रकरणात अटक केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, मुंबईतील सर्वात मोठा ड्रग सप्लायर फारूख बटाटा याचा मुलगा शादाब बटाटा याला गुरूवारी अटक करण्यात आली होती आणि त्याने चौकशी दरम्यान एजाजचा उल्लेख केला होता. सध्या एनसीबी एजाजच्या अंधेरी आणि लोखंडवाला येथील निवासस्थानावर छापे टाकत आहे. या अभिनेत्याला ड्रग्ज बाळगल्याप्रकरणी अटक करण्याची ही पहिली वेळ नाही. यापूर्वी त्याला फेसबुकवर आक्षेपार्ह पोस्ट टाकल्याबद्दल अटक करण्यात आली होती. तर ड्रग्ज बाळगल्याप्रकरणी नवी मुंबई क्राईम ब्रांचच्या अमली पदार्थ विरोधी पथकाने देखील अटक केली होती.

फारूख बटाटाचा मुलगा शादाब बॉलिवूडच्या (Bollywood) पार्ट्यांमध्ये ड्रग्स सप्लाय करत होता. मुंबईत रदेशातून येणाऱ्या ड्रग्सचा सर्वात मोठा सप्लायर फारूख बटाटाच आहे. एकेकाळी मुंबईत बटाटे विकणार फारूख ड्रग्सचा मोठा सप्लायर झाला. याने चौकशीत एजाजचे नाव घेतल्याने त्याच्यावर अटकेची कारवाई करण्यात आली आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button