हिटलरच्या छळ छावणीतून ११०० ज्यु लोकांचे प्राण वाचवणारा नाझी ऑस्कर शिंडलर!

Maharashtra Today

जगाच्या इतिहासाची पानं रक्तानं माखमाऱ्या हिटलरचा (Hitler)उल्लेख करताना क्रुरतेचा विषय निघतोच. त्याच्या शासन काळात जर्मनितल्या ८ लाख ज्यू लोकांची हत्या त्यानं केली होती. आजही त्याचं नाव क्रुरतेसाठीचा समानअर्थी शब्द म्हणून घेतलं जातं. हिटलरनं त्याच्या शासनकाळात ज्यू लोकांची हत्या करण्याचे आदेश जेव्हा सैन्याला दिले तेव्हा सैनिकांनी घरात घुसुन घुसुन लोकांच्या हत्या केल्या.

हिटलरनं ज्यु लोकांवर केलेल्या अन्याय आणि अत्याचाराचे कथन अनेक पुस्तकात केलेलं आहे. मानवतेचा थरकाप उडवणाऱ्या त्याच्या जाचातून ११०० ज्यू लोकांचे प्राण वाचवणारा ‘ऑस्कर शिंडलर’ ( Oscar Schindler)देखील तितकाच प्रसिद्ध आहे. हिटलरच्या तावडीतून ज्यू लोकांना सोडवणं हे त्याच्यासाठी मरणाच्या दाढेतून लोकांना जिवंत बाहेर काढण्यासारखं असल्यासारखं होतं.

असे वाचले १०० ज्यु लोकांचे प्राण

ऑस्कर शिंडलर, हिटलरची विचारधारा माननारा आणि त्याच्यासाठी प्राणाची बाजी लावयला तयार असणारा युवक होता. उद्योगपती शिंडलर यांच्यावर हिटलरच्या नाझी विचारसरणीचा पगडा होता. त्यांचा जन्म ८ एप्रिल १९०८ साली झाला होता. १९३० साली जेव्हा हिटलर सत्तेत आला तेव्हा जर्मनीची संपूर्ण आर्थिक परिस्थीती त्याने बदलून टाकली. याच प्रक्रियेत शिंडलर हिटलरच्या संपर्कात आला.

हिटलर सत्तेत आल्यानंतर बदलत्या आर्थिक परिस्थीतीचा शिंडलर फायदा उचलू पाहत होता. त्याचा हा प्रयत्न काही अंशापर्यत सफल झाला देखील. बौद्धिक चातुर्य आणि माणूस जिंकण्याची कला आत्मसात केलेला शिंडलर नाझी पार्टीत सामील होऊन त्यांचा सदस्य बनला. त्याला वेगान वाढणाऱ्या नाझी पार्टीची ताकद वापरुन वेगात पैसा कमवायचा होता. त्याने नाझी पार्टीत मोठे संपर्क बनवले. याच संपर्काच्या जोरावर त्यांने काळ्याबाजारातून भरपूर पैसा कमावला. अनेक बडे सैन्यअधिकारी त्यानं स्वतःच्या जाळ्यात फसवतात.

दुसऱ्या महायुद्धात बदललं आयुष्य

याच दरम्यान सप्टेंबर १९३९मध्ये जर्मनीनं पोलंडवर हल्ला केला. दुसऱ्या महायुद्धाला सुरुवात झाली. याच काळात ऑस्करचं आयुष्य बदलल्याचं बोललं जातं. युद्धात पैसा कमावण्यासाठी त्याने पत्नीला सोडून क्रोकोव शहर गाठलं. तिथं जर्मन सैन्यासाठी भांडी बनवण्याचा कारखाना त्यांनी टाकला. सुरुवातीच्या काळात त्याच्याकडे कामगार होते परंतू त्यांची संख्या मर्यादीत होती. नंतर त्याला जास्तीचे कामगार लागू लागले. या कामासाठी त्याची भेट अयझॅक स्टर्न यांच्यासोबत झाली. सर्टन यानं स्थानिक ज्यु लोकांच्या वस्तीबद्दल त्याला माहिती दिली. जिथून त्याला कंपनीसाठी कामगार मिळणार होते.

हिटलरचा अन्याय दिवसेंदिवस वाढत गेला

सुरुवातीला त्याने ज्यु लोकांना कामावर ठेवलं होतं कारण ते कमी पगारात काम करायला राजी होती. नंतर त्यांच्यासोबत काम करताना ज्यु लोकांबद्दल त्याच्या मनात प्रेम निर्माण झालं. त्याच्यातल्या माणसानं नाझी विचाराच्या त्याच्यातल्या राक्षसाचा अंत केला. नाझी हल्ल्यातून मजूरांना वाचवण्यासाठी त्याने प्रयत्न केले.

दुसरीकडे हिटलरच्या आदेशावरुन ज्यु लोकांना बकऱ्यांप्रमाणं जीवे मारलं जात होतं. त्यांच्या घरांना आगी लावल्या जात होत्या. तरुणींवर बलात्कार केले जात होते. या कारणामुळं शिंडलर याच्या मनातली हिटलर प्रतिमा मलीन झाली. नाझी पार्टीबद्दल त्याच्या मनात तिरस्कार निर्माण झाला.

ज्यु लोकांना छळ छावण्यात पाठवण्याचे मिळाले आदेश

शिंडलर प्रत्यक्षपणे हिटलरचा विरोध करु शकत नव्हता. परंतू हिटलरच्या जाचापासून वाचण्यासाठी त्यानं अनेक ज्यु लोकांना स्वतःकडे काम दिलं. त्यामुळं बाहेरील अत्याचारांपासून ज्यू लोकांचा बचाव करणं शक्य झालं. ज्या ज्यु लोकांची त्यानं भरती फॅक्टरीत सुरु केली होती ते लोक काम करण्याचा पात्रतेचे आहेत की नाही हे देखील त्याला माहिती नव्हतं.

१९४३ पर्यंत हिटलरनं क्रुरतेचा कळस गाठला. ज्यु लोकांना पुर्णपणे संपवण्याचे त्याने आदेश दिले. क्रोकोव शहरातील ज्युंना ‘प्लास्जोव’ नावच्या छळछावणीत पाठवलं जात होतं. त्यानं तेथील सैन्य अधिकाऱ्याला लाच चारुन फॅक्टरीतल्या मजुरांना छळछावणीपासून वाचवलं. १९४४५ च्या ९ मेला हिटलरनं स्वतःवर गोळी झाडली. दुसरं महायुद्ध संपलं. अशा प्रकारे नफेखोर उद्योजकाने ११०० जणांचे प्राण वाचवले. ९ ऑक्टोबर १९७४ ला जर्मनिच्या हिल्डेशममध्ये ऑस्कर शिंडलर यांचं निधन झालं.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button