निर्मीती होताच मित्रत्वात ठिणगी पाडणारा नायगाव विधानसभा मतदार संघ

नायगावबाजार : बिलोली विधानसभा मतदार संघाच्या विभाजना नंतर सन 2009 साली च्या विधानसभा निवडणूकी पुर्वी नव्याने निर्माण करण्यात आलेल्या नायगाव विधानसभा मतदार संघाची होणारी तिसरी निवडणुक आहे. विधानसभा मतदार संघाच्या निर्मीती पासून या मतदार संघावर विद्यमान आ.वसंतराव चव्हाण यांचे कायम स्वरूपी वर्चस्व राहीले आहे.

आपल्या विजयाची हॅट्रीक करण्यासाठी चव्हाण परिवार प्रयत्नांची पराकाष्ठा करीत असताना त्यांना हॅट्रीक पासून रोखण्यासाठी रिपाइ,भाजपा सेनेचे उमेदवार राजेश पवार जोरदार मोर्चे बाधंणी करीत आहेत.मागील निवडणुकीत झालेल्या पराभवाचा वचपा काढण्यासाठी त्यानी पुर्ण शक्ती पणाला लावली आहे.

सन 2009 या साली हा मतदार संघ निर्माण झाल्या नंतर प्रथमच होणा-या निवडणूकीच्या वेळी भोकर मतदार संघातून भाजपाच्या तिकीटावर निवडणुक लडविणारे बापुसाहेब गोरठेकर व नायगाव विधानसभा मतदार संघातून काँग्रेसचे उमेदवार असलेले आ.वसंतराव चव्हाण हे दोघेही दिग्गज नेते राष्ट्रवादी काँग्रेसचे मजबूत शिलेदार होते.दोघेही आमदार तर होतेच पण परमं मित्रही होते.

नायगाव च्या निर्मिती नंतर विधान परिषद सदस्य असलेल्या वसंतराव यांनी याच मतदार संघातून निवडणुक लढवायची व भोकर मतदार संघातून गोरठेकर यांनी उमेदवारी दाखल करण्याचे या मान्यवरांनी आपसात ठरविल्या नंतरही जस जशी निवडणुका जवळ येत असतानांच गोरठेकर यांचे मत परिवर्तन झाले. व त्यांनी नायगाव मतदार संघावर दावा केला.परिणामी नायगावकर व गोरठेकरामध्ये राजकीय ठिणगी पडली.कट्टर मित्रत्वाने राजकिय शत्रुत्वाची जागा घेतली.
नवनिर्मित नायगाव विधानसभा मतदार संघातून उमेदवारी मिळविण्यासाठी सन 2009 प्रचंड शक्ती प्रदर्शन दोघात झाले .शेवटी राष्ट्रवादी ची उमेदवारी बापुसाहेब गोरठेकर यानां मिळताच वसंतराव चव्हाण यांनी अपक्ष निवडणुक लडविण्याचा निर्णय घेतला.

व नवीन मतदार संघाच्या पहिल्याच निवडणुकीत जनतेच्या पाठबळावर विजय मिळवत त्यानां मतदार संघावर आपले नाव कोरले.गोरठेकराना पराभव पत्करावा लागला.दाडंगा जनसंपर्काच्या जोरावर चव्हाण यांनी हा विजय प्राप्त केला.या निवडणुकीत काँग्रेसचे आ वसंतराव चव्हाण यांना 63 हजार 534,राष्ट्रवादी चे गोरठेकर 52 हजार 414,भाजपा लक्ष्मण ठक्करवाड 15 हजार व भाजपा बंडखोर बालाजी बच्चेवार यानां 16 हजार 595 मते मिळाली होती.

या निवडणूकीच्या नंतर चव्हाण यांनी काँग्रेस पक्षाला पाठींबा देत ते काँग्रेस वासी झाले. सन 2014 च्या विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी कडून परत बापुसाहेब गोरठेकर व भगव्या युती कडून राजेश पवार तर काँग्रेस कडून चव्हाण मैदानात उतरले व त्यांनी दोघांचा पराभव करत या मतदार संघात दुस-यांदां विजय मिळवत आपले निर्विवाद वर्चस्व दाखवून दिले.या वेळी आ.वसंतराव चव्हाण यांना 71 हजार,200,राजेश पवार 60 हजार 595 तर गोरठेकर यानां 57 हजार 246 मते मिळाली होती.

सन 2019 नायगाव मतदार संघात तिरंगी लडत होत आहे.वसंतराव विजयाची हॅट्रीक करणार की राजेश पवार पराभवाचा वचपा काढणार की कवळे गुरूजी पतंग उडविण्यासाठी राहणार हे लवकरच दि.24 रोजी कळणार आहे.