हाथरस प्रकरणात नक्षल कनेक्शन, सुरू आहे ‘वहिनी’चा शोध

Naxal connection in Hathras case

हाथरस : उत्तरप्रदेशच्या हाथरसमधील सामूहिक बलात्कार आणि हत्याप्रकरणाच्या  चौकशीत हे प्रकरण तापवण्यात नक्षलवाद्यांचा हात असल्याचे संकेत मिळत आहेत, असे कळते. यानंतर खळबळ उडाली आहे. ही नवी माहिती शनिवारी मिळाली. एसआयटीची टीम या संदर्भात मध्यप्रदेशमधील जबलपूर येथील एका महिलेचा शोध घेते आहे. संशयित नक्षलवादी महिला पीडितेच्या घरात वहिनी म्हणून कुटुंबासोबत राहात होती. ती १६ ते २२ सप्टेंबरपर्यंत कट रचत होती. याआधी शुक्रवारी पोलिसांनी सांगितले की, या प्रकरणाशी संबंधित ‘फंडिंग’ प्रकरणात ‘पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया’ (पीएफआय) आणि ‘भीम आर्मी’च्या संबंधाचे धागेदोरे सापडले आहेत.

एसआयटीच्या सूत्रांनी म्हटले आहे की, नक्षलवादी महिलेने डोक्यावरून पदर घेऊन चेहरा झाकला होता आणि ती पोलीस आणि एसआयटीशी बोलत होती. ती घटनेच्या दोन दिवसांनंतर पीडित मुलीच्या गावी आली होती. पीडित मुलीच्या घरात राहून ती कुटुंबातील सदस्यांना भडकावत होती, असा आरोप आहे. वहिनी म्हणून आलेल्या त्या नक्षलवादी कार्यकर्तीच्या ‘कॉल डिटेल’मधून धक्कादायक माहिती हाती लागली आहे.

सुरक्षा यंत्रणांच्या म्हणण्यानुसार, यूपी पोलीस आणि एसआयटीची टीम परकीय फंडिंगसंदर्भात नक्षलवादी कनेक्शनवर तपास काम करत आहे. एसआयटीच्या तपासणीत यापूर्वी पहिले जातीय दंगलीचे षडयंत्र उघड झाले होते. पोलीस त्या महिलेचा आणि तिच्या जवळच्या मित्रांचा शोध घेत आहेत. एसआयटीने  चार  डझन लोकांची चौकशी केली आहे. पोलिसांनी चार  जणांना अटक केली असून ते पीएफआयचे सदस्य असल्याचे सांगितले जात आहे.

नेपाळ सीमेवर पीएफआय उपक्रम

अटक केलेल्या सदस्यांपैकी एक बहराइचमधील जरवलचा रहिवासी आहे. यानंतर, उत्तरप्रदेश पोलीस सक्रिय झाले आहेत. बहराइच पोलिसांचे म्हणणे आहे की, हा परिसर भारत-नेपाळ सीमेला लागूनच आहे आणि पीएफआयशी संबंधित इतर काही लोकांना अलीकडच्या काळात अटक करण्यात आली आहे. अशा परिस्थितीत उत्तरप्रदेश व देशात जातीय दंगली पसरवण्यासाठी भारत-नेपाळ सीमेवर पीएफआयच्या हालचालींचा शोध घेणे सुरू आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER