छत्तीसगडमध्ये नक्षलवाद्यांचा हल्ला; जवानांची बस स्फोटाने उडवली, तीन जवान शहीद

Naxal Attack

नारायणपूर : छत्तीसगडच्या (Chhattisgarh) नारायणपूरमध्ये (Narayanpur) नक्षलवाद्यांनी डीआरजी आणि आयटीबीपीच्या जवानांनी भरलेल्या बसला स्फोटांनी उडवल्याची घटना घडली आहे. या स्फोटात तीन जवान शहीद झाले असून, आठ जवान गंभीर जखमी झाले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, हा स्फोट आयईडीने घडवण्यात आला. नक्षलवाद्यांनी काडेनर आणि मांडोडाजवळ जवानांच्या बसला लक्ष्य केले. जवान आपले ऑपरेशन पूर्ण करून परतत असतानाच नक्षलवाद्यांनी त्यांच्यावर घात लावून हल्ला केला.

नक्षलवाद्यांनी (Naxal) केलेल्या आयईडी स्फोटात डीआरजीच्या (जिल्हा राखीव गार्ड) जवानांचा मृत्यू झाल्याची माहिती छत्तीसगडचे डीएम अवस्थी यांनी दिली. ते म्हणाले की, नारायणपूर जिल्ह्यात नक्षलवाद्यांनी केलेल्या स्फोटात डीआरजीच्या (जिल्हा राखीव गार्ड) जवानांचा मृत्यू झाला. तर काहींची प्रकृती चिंताजनक आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER