नवाब मलिक यांचे जावई समीर खान यांना अटक; घरावर एनसीबीचा छापा

Nawab Malik-Sameer Khan-NCB

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते आणि राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक (Nawab Malik)यांना मोठा झटका बसला आहे. बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूत याच्या आत्महत्येनंतर एनसीबीने (NCB )मुंबईतील अंमली पदार्थांची तस्करी करणाऱ्यांभोवती फास आवळण्यास सुरुवात केली आहे. याच प्रकरणात मलिक यांचा जावई समीर खान (Sameer Khan) याला एनसीबीकडून बुधवारी रात्री उशिरा अटक करण्यात आली. तर समीर खानच्या वांद्रे स्थित घरावर एनसीबीने आज पहाटे छापा टाकला असून, सध्या सर्च ऑपरेशन सुरू आहे. त्यामुळे आधीच सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांच्यावरील आरोपाने बेजार झालेल्या राष्ट्रवादीला मलिक यांच्या जावयावर झालेल्या कारवाईमुळे आणखी एक मोठा धक्का बसला आहे.

मंत्री नवाब मलिक यांचे जावई समीर खान यांना नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोने (एनसीबी) समन्स बजावले होते. मुच्छड पानवाला ड्रग्ज प्रकरणात हे समन्स बजावण्यात आले होते. याप्रकरणी त्यांची बुधवारी सकाळपासून चौकशी सुरु होती. एनसीबीच्या सूत्रांच्या माहितीनुसार, करण सजनानी आणि समीर या दोघांमधील ड्रग्ज बाबतटचे चॅट आणि पैशांची देवाण-घेवाणचे पुरावे एनसीबीला सापडले आहेत

नवाब मलिक यांची कन्या निलोफर यांचे समीर खान हे पती आहेत. ड्रग्जप्रकरणातील संशयित करण सजनानी यांच्यासोबत समीर खान यांचा गुगल पे द्वारे 20 हजार रुपयांचा व्यवहार झाला होता. सजनानी याने ड्रग्ज पुरवल्यामुळे समीर यांनी त्यांना 20 हजार रुपये गुगल पेने पाठवल्याचं सांगितलं जातं. त्यामुळे या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी एनसीबीने समीर यांना बोलावलं होतं. जवळपास 10 तास कसून चौकशी केल्यानंतर त्यांना ताब्यात घेण्यात आले.

ही बातमी पण वाचा : राष्ट्रवादीवर राजकीय संक्रांत! मुंडेंवरील बलात्काराचे आरोप ताजे असतानाच मलिक यांच्या जावयाला ड्रग्ज प्रकरणी नोटीस

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER