संपूर्ण देश एकसंघ, किती जणांना अटक करता बघुया, नवाब मलिकांचे भाजपला आव्हान

Nawab Malik

मुंबई : ‘आपल्या देशात कोरोनाचे (Corona) रूग्ण मोठ्याप्रमाणात आढळत असताना, कोरोना लसींचा (Corona Vaccine) तुटवडा असताना आपल्या हक्काची लस परदेशात का पाठवली हा प्रश्न तर लोक विचारणारच आहे. आता हा प्रश्न करणाऱ्या किती जणांना भाजप सरकार अटक करणार आहे. लोकांचा आवाज दाबण्याची ही केंद्र सरकारची कायरता आहे,’ अशी संतप्त प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक (Nawab Malik) यांनी दिली. संपूर्ण देश एकजूट आहे. किती लोकांना अटक करताय बघूया, असे आव्हानही नवाब मलिक यांनी भाजपला दिले आहे.

डाओसमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आम्ही लसगुरु बनल्याचे जाहीर केले होते. यूएनमधील भारतीय दुतावासाने सांगितले की, जेवढे लसीकरण भारतात करण्यात आले नाही त्यापेक्षा जास्त लसी परदेशात पाठवण्यात आली आहे. आता केंद्र सरकार मात्र एक कोटी लसी पाठविल्याचे म्हणत आहे. तर काहीजण पाच कोटी लसी पाठवायच्या होत्या म्हणून पाठवल्याचे बोलत आहेत. जेव्हा देशात लसींचा तुटवडा निर्माण झाला तेव्हाच हा प्रश्न उपस्थित केला जात आहेत, असं नवाब मलिक म्हणाले.

मोदीजी, आमच्या मुलांच्या हक्काची लस विदेशात का पाठवली अशी पोस्टर्स काही लोकांनी लावली आहेत. तर भाजपचे काही लोक लहान मुलांची लस तयारच झाली नसल्याचे सांगत आहेत. सर्व भारतीय भारतमातेची लेकरं आहेत. लस परदेशात पाठवली तर लोकं प्रश्न उपस्थित करतीलच. परंतु केंद्र सरकार प्रश्न विचारणाऱ्या लोकांना गुन्हा दाखल करुन अटक करत आहे. संपूर्ण देश प्रश्न विचारतोय. मोदीजी, तुम्ही किती लोकांना अटक करणार?, असा संतप्त सवालही त्यांनी उपस्थित केला आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button