परवानगी नसताना ‘Moderna’ची लस नागरिकांना का देतायेत; नवाब मलिकांचा केंद्रावर आरोप

Nawab Malik-Moderna vaccine

मुंबई :- राज्यात कोरोनावर मात करण्यासाठी लसीकरणावर (Corona Vaccine) भर दिला जात आहे. पण देशात फक्त तीनच कंपन्यांना परवानगी आहे. फ्रान्समधील नागरिकांना ‘Moderna’ची लस देण्याचे काम कोणत्या पद्धतीने सुरू आहे. त्यांना विशेष बाब म्हणून परवानगी दिली का? असा सवाल राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) प्रवक्ते नवाब मलिक (Nawab Malik) यांनी केला आहे.

देशभरात लसीकरणाचा तुटवडा मोठ्या प्रमाणात जाणवत आहे. त्यामुळे सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप-प्रत्यारोप सुरू आहे. केंद्र सरकारने भारत बायोटेक आणि सिरम इन्स्ट्यिट्यूट व स्फुटनिकला परवानगी दिली आहे, असे असताना या देशात आणि मुंबईच्या आजुबाजुला ‘Moderna’चे लसीकरण सुरू आहे, अशी माहिती उपलब्ध झाल्याचा आरोप नवाब मलिकांनी केला आहे.

देशात लसीकरणासाठी केंद्र सरकारने भारत बायोटेक, स्पुतनिक व सिरमच्या लसीला परवानगी दिली असताना मुंबई शहराच्या आसपास Moderna कंपनीच्या लसीचे लसीकरण परदेशातील दुतावासांना कसे करण्यात येते, याचा खुलासा करण्याची मागणी नवाब मलिक यांनी केंद्र सरकारकडे केली आहे.

“सध्याच्या काळात देशातील लोकांना लस मिळत नाही. हा गंभीर प्रश्न असताना हे लसीकरण कसे सुरू आहे आणि या लसीकरणाला विशेष परवानगी देण्यात आली का? तीनच कंपन्यांना परवानगी असताना Moderna ची लस कशी काय दिली जातेय?” असा प्रश्नदेखील मलिकांनी केंद्र सरकारला केला आहे.

Disclaimer : बातमीत एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. महाराष्ट्र टुडेच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व महाराष्ट्र टुडे स्वीकारत नाही.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button