प्रवीण दरेकर जॅकेट घालून आरशात पाहून टीव्हीवर येतात, याला घेरणं म्हणत नाही ; नवाब मलिकांचे टीकास्त्र

Pravven Darekar-Nawab Malik

मुंबई :- विरारमधील रुग्णालयातील कोविड सेंटरला भीषण आग लागली. या आगीत १४ जणांचा होरपळून मृत्यू झाला आहे. विरार येथील घटना ही नॅशनल न्यूज नाही, असं विधान आरोग्यमंत्री राजेश टोपे (Rajesh Tope) यांनी केलं आहे. त्यावर विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर (Praveen Darekar) यांनी संताप व्यक्त केला आहे. आणखी किती बळी हवे आहेत? असा संतप्त सवाल करतानाच या मंत्र्यांना पायउतार करा, असे प्रवीण दरेकर यांनी म्हटले आहे. दरेकर यांच्या टीकेला राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक (Nawab Malik) यांनी प्रत्युत्तर दिले आहे .

दरेकर जॅकेट घालून आरशासमोर पाहून टीव्हीसमोर येतात. मी कसा दिसतो, असं कॅमेरामनला विचारतात. याला सरकारला घेरणं म्हणत नाहीत, अशी खोचक टीका नवाब मलिक यांनी केली आहे.

राज्यात फायर ऑडिट केल्याशिवाय कोणत्याही रुग्णालयाला परवानगी देण्यात येत नाही. खासगी रुग्णालयात कधी कधी एसीमध्ये शॉर्ट सर्किट होऊन आग लागते. अशा वेळी सरकारला जबाबदार धरणं योग्य नाही, असं सांगतानाच सरकारला कोण घेरतंय हा प्रश्नच आहे. येड्यासारखे लोक बोलत आहेत. ऊठसूट जॅकेट घालून कॅमेऱ्यासमोर येत आहेत. प्रतिक्रिया देण्यापूर्वी मी कसा दिसतो असं कॅमेरामनला विचारतात. काही विरोधी पक्षनेते तर कार्यालयात बसून केवळ प्रतिक्रिया देण्याचं काम करत आहेत, असा टोला मलिक यांनी लगावला.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button