…म्हणून राज्यपालांनी आमदारांच्या नियुक्तीचा निर्णय अनिर्णीत ठेवला : नवाब मलिक

Nawab Malik-maharashtra governor

मुंबई : विधान परिषदेवर १२ आमदारांच्या नियुक्तीबाबत राज्य मंत्रिमंडळानं राज्यपालांकडे शिफारस केली होती. या घटनेला सात महिने होत आले तरी निर्णय घेतलेला नाही. यावरून राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय (NCP) प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक (Nawab Malik) यांनी राज्यपालांवर निशाणा साधला. ‘त्या’ कायद्यात वेळ निश्चित नसल्याने त्याचा फायदा घेऊन राज्यपालांनी विधान परिषदेच्या १२ आमदारांच्या नियुक्तीचा निर्णय अनिर्णीत ठेवला असल्याचे मत मलिक यांनी व्यक्त केले आहे.

न्यायमूर्ती शाहरूख काथावाला आणि न्यायमूर्ती सुरेंद्र तावडे यांच्या खंडपीठानं याचिकाकर्त्यांना थेट राज्यपालांच्या सचिवांना या याचिकेत प्रतिवादी करण्याचे निर्देश देत सर्व प्रतिवाद्यांना प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे निर्देश दिले आहेत. तसंच यासंदर्भातील सुनावणी ९ जूनपर्यंत तहकूब केली आहे. या घडामोडींवर मंत्री नवाब मलिक यांनी भाष्य केले आहे. दरम्यान जनहित याचिकेवर न्यायालयाने विचारल्यानंतर त्यावर निर्णय राज्यपाल घेतील व न्यायालयाला कळवतील, असा विश्वासही नवाब मलिक यांनी व्यक्त केला आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button