… तेव्हा शरद पवारांनी जनमताचा विचार केला : नवाब मलिक

Sharad Pawar - Nawab Malik

मुंबई :  शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) हे तिन्ही पक्ष एकत्र येत सत्ता स्थापन केली. या  तीन पक्षांनी एकत्र यावं, अशी माझी २०१४ सालापासूनची इच्छा होती. मी याबाबत आधीच सांगितलं होतं. पण राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी तेव्हा भाजपला दिलेल्या जनमताचा विचार केला.

त्यामुळे भाजपचे सरकार बनले, असा दावा राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक (Nawab Malik) यांनी केला. केंद्रीय यंत्रणांचा मोदी सरकार गैरवापर करत आहे. जनता उघड्या डोळ्याने पाहात आहे. मागच्या निवडणुकांमध्ये उत्तर मिळालं. पण पुढच्या निवडणुकीतही मिळेल. राज्य सरकार कुणाला घाबरत नाही.

जेवढी कारवाई होईल त्याला नेते आणि पक्ष कार्यकर्ते जोमाने उत्तर देतील. तितक्याच  जोमानं काम करतील, अशी भूमिका नवाब मलिक यांनी मांडली. दरम्यान भाजपला सत्तेशिवाय राहता येत नाही. सध्या भाजपची गोची होतेय. जे भाजपमध्ये आहेत, ते सोडून जायला तयार आहेत, असा घणाघात नवाब मलिक यांनी केला.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER