एनसीबीने जावयाला अटक केल्यानंतर नवाब मलिक म्हणाले, ‘कायद्यापेक्षा कोणीही मोठा नसतो’

Nawab Malik

मुंबई: एनसीबीच्या पथकाने बुधवारी रात्री उशिरा राष्ट्रवादीचे प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक (Nawab Malik) यांचे जावई समीर खान (Sameer Khan) यांना अटक केली असून, आज सकाळी त्यांच्या घरावर धाड टाकली. सध्या एनसीबीकडून (NCB)याठिकाणी महत्त्वाच्या पुराव्यांची शोधाशोध सुरु आहे. या पार्श्वभूमीवर नवाब मलिक यांनी एक ट्विट केले आहे.

यामध्ये नवाब मलिक यांनी म्हटले आहे की, कोणीही कायद्यापेक्षा मोठा नसतो. कोणत्याही भेदभावाशिवाय हा नियम सगळ्यांना लागू झाला पाहिजे. कायदा त्याचं काम करेल आणि न्याय नक्की मिळेल. मला न्यायसंस्थेविषयी पूर्ण आदर आणि विश्वास असल्याचे नवाब मलिक यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER