…तर देशाची अर्थव्यवस्था पूर्णपणे कोलमडून पडेल; राष्ट्रवादी काँग्रेसने व्यक्त केली चिंता

nawab-malik-on-slowdown-economy

मुंबई : देशात कोरोना संकटाच्या (Corona Crises) पार्श्वभूमीवर अर्थव्यवस्था ढासळत चालली आहे . हे पाहता राष्ट्रवादी काँग्रेसने (NCP) भीती व्यक्त केली.

रिझर्व्ह बॅंकचे गव्हर्नर (RBI) किंवा त्यांची संपूर्ण व्यवस्था देशाची अर्थव्यवस्था मोजण्यात अपयशी होत असेल तर देशाची अर्थव्यवस्था पूर्णपणे कोलमडून पडेल, असे राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक (Nawab Malik) म्हणाले . प्रसार माध्यमांशी संवाद साधताना ही प्रतिक्रिया व्यक्त केली.

देशाचा जीडीपी 7.5 टक्के मायनसमध्ये गेला आहे . यावरून रिझर्व्ह बॅंकेकडून आकलन चुकीचे होत आहे. सरकार पैसे मागतेय तर तुम्ही देताय. रिझर्व्ह बॅंकेला हे कळलं पाहिजे. तुम्ही अंदाज घेत नाही मग देशाची अर्थव्यवस्था कशी चालणार आहे? असा सवालही मलिक यांनी केला. रिझर्व्ह बॅंकेने कबूल केले आहे हे चांगलं आहे परंतु आकलन चुकत असेल तर हे देशासाठी धोक्याचे आहे , असेही मलिक म्हणाले .

मलिक यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या लसीकरणाच्या धोरणावरही भाष्य केले . केवळ बैठका घेऊन फक्त या महिन्यात 12 कोटी, डिसेंबरपर्यंत 210 कोटी लसी उपलब्ध होईल असे सांगणे किती योग्य आहे, असा सवाल मलिक यांनी उपस्थित केला .

केंद्र किती लस खरेदी करणार, राज्यांना किती मिळणार आणि खाजगी लोकांना खरेदी करून त्यांनी त्याचा वापर किती करावा याबाबतची स्पष्टता केंद्रसरकारने आजपर्यंत जाहीर केलेली नाही, असेही मलिक म्हणाले .

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button