…यासाठी भाजपकडून मोदी विरुद्ध योगी वातावरणाची निर्मिती – नवाब मलिक

मुंबई :- मागील दिवसांपासून पंतप्रधान मोदी (PM Modi) आणि उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ (Yogi Adityanath) यांच्यामध्ये मतभेद असल्याच्या बातम्या प्रसारमाध्यमांमध्ये झळकत आहेत. परंतु कोरोना काळातील अपयश झाकण्यासाठी भाजपची ही ठरवून केलेली रणनीती असल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय (NCP) प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक (Nawab Malik) यांनी केला आहे.

नवाब मलिक म्हणाले की, कोरोना (Corona) काळात उत्तरप्रदेशमधील करोनाबाधित रुग्णांचे मृतदेह फेकण्यात आल्याचे भयावह चित्र संपूर्ण देशाने आणि जगाने पाहिले. यामुळे योगी सरकारच्या भोंगळ कारभाराचे वाभाडे निघाले. उत्तर प्रदेशातील हे अपयश झाकण्यासाठी मोदी विरुद्ध योगी असे वातावरण निर्मिती करण्याची भाजपची योजना असल्याचं नवाब मलिक यांनी सांगितले.

तसेच चार वर्षांत योगींनी आपल्या कार्यकाळात फक्त राज्यात घृणा निर्माण केली आहे. सर्वसामान्य जनतेला फायदा होईल अशी एकही योजना उत्तर प्रदेशमध्ये राबवण्यात आली नाही. कोरोनात केवळ सरकारच्या तिजोरीतील निधी मोठमोठ्या जाहिरातींवर उधळण्यात आला. उत्तर प्रदेशमध्ये आपला पराभव होणार आहे याची जाणीव भाजपला आली आहे. त्यामुळेच भाजपची चिंता वाढली आहे. उत्तर प्रदेशात भाजपाला पराभवाचा सामना करावा लागणार हे निश्चित आहे, असा टोला नवाब मलिकांनी लगावला.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button