ही भेट राजकीय कारणास्तव आहे, असा अर्थ काढणे चुकीचे आहे : नवाब मलिक

Nawab Malik on fadnavis meet sharad pawar

मुंबई : विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी काल राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांची भेट घेतली. यावरून तर्कवितर्क लढवले जात आहे. मात्र, सत्ताधारी आणि विरोधक दुश्मनासारखे कधीच काम करत नाहीत. अशा भेटी होत असतात. याचा चुकीचा अर्थ काढू नका, असे राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक (Nawab Malik) यांनी सांगितले.

राजकीय अर्थ काढणे योग्य नाही
“महाराष्ट्रात सत्ताधारी आणि विरोधी पक्ष दुश्मनासारखे काम करत नाही ही महाराष्ट्राची परंपरा आहे. इथे व्यक्तिगत नाती टिकवली जातात. शिवाय व्यक्तिगत गाठीभेटीही होतात. परंतु या भेटी राजकीय कारणासाठी होतात, असा अर्थ काढणे चुकीचे आहे. विरोधी पक्षाचे काम विरोधी पक्ष करत असतो, तर सत्ताधारी सत्ताधाऱ्यांचे काम करतात. महाविकास आघाडी पवारांनी बनवली आहे. यामुळे कोणीही या भेटीचा चुकीचा अर्थ काढू नये. शरद पवार डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार घरी विश्रांती घेत होते. या कालावधीत अनेक लोकांनी तब्येतीची घरी जाऊन विचारपूस केली. या अनुषंगाने फडणवीस यांनी ही सदिच्छा भेट घेतली दुसरे काही नाही.” असे मलिक यांनी स्पष्ट केले.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button