‘ती’ माहिती लोकांपासून का लपवायची ? नवाब मलिक यांचा सवाल

Nawab Malik

मुंबई : कोरोना लसीकरणाबाबतचा (Corona Vaccination) माहितीचा डाटा सार्वजनिक करू नका, असे केंद्राने राज्यांना सांगितले आहे. मात्र किती लसी आम्हाला दिल्या आणि किती लसीकरण (Vaccination) केले हे लोकांना सांगणे गरजेचे आहे. ही माहिती लोकांपासून का लपवायची, असा सवाल राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) राष्ट्रीय प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक (Nawab Malik) यांनी उपस्थित केला आहे. किती लसी आल्या, किती लोकांना लसीकरण करण्यात आले याची माहिती स्वतः केंद्र सरकारने दर आठवड्याला जाहीर करावी.

कुठल्या राज्याला किती लसी दिल्या हे सांगावे. किती लसीकरण केले याची पारदर्शक माहिती द्यावी. माहिती लपवून कोरोनाला हरवू शकत नाही, असेही नवाब मलिक यांनी म्हटले. केंद्र सरकारने १२ कोटी लस पुरवठा जूनपर्यंत देण्याची घोषणा केली होती. १० दिवस उलटून अकरावा दिवस उजाडला तरी केंद्र सरकारने केलेल्या घोषणेची अंमलबजावणी झालेली नाही. केंद्र सरकार फक्त घोषणा करते, त्यावर अंमलबजावणी होत नाही. लस उपलब्ध करण्यात केंद्र सरकार अपयशी ठरले आहे. हे लपवण्यासाठी लसीकरणाचा डाटा सार्वजनिक करू नका. यामुळे मार्केटिंग कंपन्यांना फायदा होईल असे सांगत आहे. मात्र, हा दावा तथ्यहीन असल्याचे नवाब मलिक म्हणाले आहेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button