सोशल मीडियावर बंदी; लोकांना तुरुंगात टाकणे हाच केंद्राचा प्रयत्न – नवाब मलिक

Nawab Malik on Centre attempt Banning social media

मुंबई :- केंद्र सरकारने (Central Govt) सोशल मीडियासाठी नवीन नियमावली जाहीर केल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसने (NCP) केंद्र सरकारवर टीकास्त्र सोडलं आहे. व्हॉटसॲपच्या आधारावर लोकांवर गुन्हे दाखल करून आणि त्या आधारावर त्यांना शिक्षा व्हावी. सोशल मीडियाला संपवणं आणि त्या आधारावर लोकांना तुरुंगात टाकण्यासाठीच केंद्र सरकारचा हा सारा खेळ सुरू आहे, असा आरोप राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक (Nawab Malik) यांनी केला आहे.

केंद्रात आज भाजप सत्तेत आहे. या सोशल मीडियाच्या (Social Media) माध्यमातूनच भाजप सत्तेवर आली आहे. आता त्याच सोशल मीडियावर आज भाजप अंकुश लावण्याची योजना आखात आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून देशातील जनता केंद्र सरकारच्या विरोधात बोलत आहे. आपलं म्हणणं प्रखरतेनं मांडताना दिसत आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून विरोधात वातावरण निर्माण होत असल्याचे लक्षात आल्यावर त्याला अंकुश लावण्याचा आणि लोकांच्या खासगी आयुष्यात घुसण्याचा प्रयत्न केंद्रातील भाजप सरकार करत आहे, असा आरोप मलिक यांनी केला. आज व्हॉटस्ॲप चॅटच्या आधारावर गुन्हे दाखल केले जात आहेत. परंतु न्यायालय व्हॉटस्ॲप चॅट कायदेशीर पुरावा मानत नाही.

परंतु, केंद्रातील भाजप सरकार व्हॉटस्ॲप चॅटच्या आधारावर गुन्हे दाखल व्हावेत, त्या आधारे लोकांना शिक्षा व्हावी यासाठी प्रयत्न करत आहेत. दरम्यान भाजपच्या या कुटील डावाचा आणि लोकांच्या खासगी आयुष्यात घुसण्याच्या कार्यक्रमाला आमचा तीव्र विरोध आहे, असंही त्यांनी स्पष्ट केलं.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button