नवाब मलिक राष्ट्रवादीचे प्रवक्ते, त्यांनी काँग्रेसबद्दल बोलू नये; थोरातांनी सुनावले

Balasaheb Thorat & nawab malik

मुंबई : सोनिया गांधी (Sonia Gandhi) आमच्या नेत्या आहेत आणि आघाडी सरकारच्या मार्गदर्शक आहेत. त्यांचे पत्र मार्गदर्शनपर समजावे. नवाब मलिक (Nawab Malik) राष्ट्रवादीचे प्रवक्ते आहेत. त्यांनी इतर पक्षात काय चाललंय हे बघू नये. विशेषतः  काँग्रेसमध्ये त्यांनी पाहू नये, या शब्दात काँग्रेसचे (Congress) प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat) यांनी मलिकांना सुनावले.

काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांनी थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांना पत्र लिहून महाविकास आघाडीच्या (Mahavikas Aghadi) किमान समान कार्यक्रमाची आठवण करून दिली. या मुद्द्यावरून राष्ट्रवादीचे नेते आणि प्रवक्ते नवाब मलिक यांनी तिरकस भाष्य केल्यानंतर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी मलिक यांचे कान टोचले आहेत. आम्ही एकत्र आहोत आणि महाविकास आघाडी एकत्र काम करेल; व्यवस्थित चालेल असा विश्वास आहे, असेही थोरात म्हणाले.

सोनिया गांधी यांचे पत्र

सरकार स्थापन करताना दलित आणि आदिवासी विकासासाठी नियोजित कार्यक्रम करण्याचे ठरविले होते. आता त्यावर लक्ष केंद्रित करण्याची भूमिका मुख्यमंत्र्यांना लिहिलेल्या पत्रातून सोनिया गांधी यांनी मांडली आहे. अनुसूचित जाती / जमातींसाठी योजना आणि त्यासाठी निधी उपलब्ध करून देण्याबाबत सोनिया गांधी यांनी पत्रात उल्लेख केला आहे.

राज्यातील सामाजिक न्याय आणि आदिवासी विकास विभागांमध्ये मोठ्या प्रमाणात विकास निधी कमी केला गेला आहे. त्यावरूनच सोनिया गांधी यांनी भूमिका घेत आदिवासी आणि दलित समाजासाठी निधी उपलब्ध करून द्यावा, ही भूमिका मांडली आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER