नवाब मलिक सच्चे मुसलमान नाहीत : आचार्य तुषार भोसले

Maharashtra Today

मुंबई : ब्रुक फार्मा कंपनीच्या (Brooke Pharma Company)मालकाविरोधात कारवाईनंतर भाजपा नेत्यांनी घेतलेल्या भूमिकेवरून अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते. केंद्र सरकार औषध कंपन्यांना धमकावत असल्याचा आरोपही त्यांनी केला होता. दरम्यान, राजेंद्र शिंगणे यांनी रेमडेसिविरचा राज्यात अनधिकृत साठा नाही, असे सांगितल्यानंतर भाजपाने आक्रमक पवित्रा घेतली आणि नवाब मलिकांची (Nawab Malik)मंत्रिमंडळातून हकालपट्टी करण्याची मागणी केली आहे.

या दरम्यान, भाजपा अध्यात्मिक आघाडीचे प्रदेशाध्यक्ष आचार्य तुषाऱ भोसले (Acharya Tushar Bhosale) यांनी नवाब मलिकांवर निशाणा साधला आहे. “नवाब मलिक सच्चे मुसलमान नाहीत किंवा ते अल्लाहचे गुनाहगार आहेत. रमजानच्या पवित्र महिन्यात वाईट काम करायचे नसते आणि खोटे बोलायचे नसते, हे लहान मुलांनाही कळते. पण नवाब मलिक सारखे लोक आजच्या महामारी संकटात खोटे बोलून समाजात विष पसरवण्याचे काम करत आहेत. त्यांच्याच लोकांनी त्यांना उघडे पाडले. सत्तेच्या नशेमध्ये रमजानसारख्या पवित्र महिन्याचे पावित्र्य घालवण्याचे काम नवाब मलिक यांनी केले आहे. म्हणूनच ते सच्चे मुसलमान नाहीत आणि ते अल्लाहचे गुन्हेगार आहेत. कारण त्यांनी रोजा सुद्ध तोडला आहे.” असे आचार्य तुषार भोसले म्हणाले.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button