दोन वर्षापूर्वीचा व्हिडिओ शेअर करून मला बदमान करण्याचा प्रयत्न – नवाब मलिक

Nawab Malik

मुंबई :- राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल जयघोष करत असताना नवाब मलिक मात्र गप्प बसल्याचं दिसत असल्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडिओवरून नवाब मलिक यांच्यावर टीकाही होतांना दिसून येत आहे. आता यावर खुद्द मलिक यांनी स्पष्टीकरण दिले आहे. ‘शेअर झालेला व्हिडीओ दोन वर्षापूर्वीचा आहे,’ असे म्हणत वायरल व्हिडीओवर अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी स्पष्टीकरण दिलं आहे.

छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल जयघोष करत असताना नवाब मलिक गप्प का ?- राम कदम

याबाबत ते एका मराठी वृत्तवाहिनीला मुलाखत देताना बोलत होते. यावेळी बोलताना ते म्हणाले, ‘भाजपाकडून दोन वर्षापूर्वीचा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे, भाजपाला माझी इतकी भीती का? मला बदनाम करण्याचा भाजपाचा प्रयत्न आहे,’ असा आरोप मलिक यांनी.

पुढे बोलताना ते म्हणाले की, ‘जयघोष होत असतांना गर्दी असल्यामुळे हात वरती करता आला नाही,’ असे स्पष्टीकरण मलिक यांनी दिले.


Web Title : Nawab malik explanation on viral video

Maharashtra News : Latest Mumbai News only on Maharashtra Today