नवाब मलिक, काळोखातले बोकड धंदे तुम्हाला शोभत नाहीत – भाजपा आमदाराची टीका

Maharashtra Today

मुंबई :- उस्मानाबाद जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते आणि मंत्री नवाब मलिक यांच्या मालकीच्या दीडशे एकर जमिनीवर रात्री अंधारात शेळी-बोकडांचा बाजार भरतो, अशी माहिती देऊन भाजपाचे आमदार अतुल भातखळकर (Atul Bhatkhalkar) यांनी टोमणा मारला – नवाब मलिक (Nawab Malik), काळोखातले बोकड धंदे तुम्हाला शोभत नाहीत.

अतुल भातखळकर म्हणाले, “संपूर्ण महाराष्ट्रात लॉकडाऊन असताना उस्मानाबाद जिल्ह्यात मंत्री नवाब मलिक यांच्या मालकीच्या जमिनीवर रात्रीच्या अंधारात शेळी आणि बोकडांचा बाजार भरत असल्याचे उघड झाले आहे. रोज सकाळी उठून मोदी सरकारला सल्ला देणाऱ्या नवाब मलिकांना काळोखातले हे बोकड धंदे शोभत नाहीत.” याबाबत भारतीय जनता पार्टीने उस्मानाबादच्या जिल्हाधीकाऱ्यांना तक्रार दिली आहे.

राज्य सरकार आणि प्रशासन करोनाचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी अनेक उपाययोजना राबवत असताना या बोकडांच्या बाजारामुळे खळबळ उडाली आहे. उस्मानाबाद भाजपाचे जिल्हाध्यक्ष नितीन काळे यांनी नबाब मलिक यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. नबाब मलिक यांच्या दबावामुळे बाजार भरवणारे तसेच संबंधितांवर कारवाई करण्यात आली नाही, असे नितीन काळे यांनी म्हटले आहे.

Disclaimer : बातमीत एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. महाराष्ट्र टुडेच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व महाराष्ट्र टुडे स्वीकारत नाही.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button