आता पेट्रोलने शंभरी गाठली मग हे नशीब कुणाचे; नवाब मलिकांचा मोदींवर हल्लाबोल

Nawab Malik-PM Modi

मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Modi) २०१५ मध्ये म्हणाले की, माझ्या नशिबाने जर पेट्रोलचे भाव (Petrol prize hike) कमी झाले असते, तर चांगले झाले असते. परंतु, २०२१ मध्ये पेट्रोलच्या दराने शंभरी गाठली आहे. मात्र, आता हे नशीब कोणाचे आहे, अशी खोचक टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) राष्ट्रीय प्रवक्ते नवाब मलिक (Nawab Malik) यांनी केली आहे.

जगात पेट्रोल-डिझेलचे दर स्थिर असताना भारतातच दर का वाढवले जात आहेत, हे मोदींनी जनतेला सांगावे, अशी मागणी नवाब मलिकांनी यापूर्वी केली होती. मात्र, मोदींनी या प्रश्नाचे उत्तर न देता उलट पेट्रोल-डिझेलचे दर वाढवले आहे. याच दरवाढीवरून मलिकांनी मोदींना २०१५ मधील त्यांच्या वक्तव्याची आठवण करून दिली. आता पेट्रोलने शंभरी गाठली मग हे नशीब कुणाचे! पेट्रोलने शंभरी पार केल्यानंतर २०१५ मध्ये बोलणारे मोदी २०२१ मध्ये काहीच बोलत नाही. त्यामुळे शेवटी काय ‘बदनसीब जनता’ असे ट्विट मलिकांनी केले आहे. याचबरोबर त्यांनी व्हिडीओ शेअर करत त्यांच्यावर निशाणा साधला आहे.

राज्यात एकीकडे कोरोनाचा प्रादुर्भाव तर दुसरीकडे लॉकडाऊन! यामुळे अनेक जण बेरोजगार झाले आहेत. गेल्या काही दिवसात देशात इंधनाची दरवाढ होत आहे. यामुळे पुन्हा एकदा महागाईचा भडका उडाला आहे. देशभरात पुन्हा एकदा पेट्रोल-डिझेलच्या दरात वाढ झाली आहे. महाराष्ट्रातील बहुतांश शहरात पेट्रोलने शंभरी गाठली आहे. तर डिझेलच्या दराने नव्वदी पार केली आहे.

Disclaimer : बातमीत एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. महाराष्ट्र टुडेच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व महाराष्ट्र टुडे स्वीकारत नाही.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button