नवरात्रौत्सव : दुर्गामूर्ती आगमन व विसर्जन साध्या पद्धतीने

Durga

कोल्हापूर : कोरोनाची रुग्णसंख्यादिवसेंदिवस घटत असेल, तर सार्वजनिक कार्यक्रम करण्यात अद्याप परवानगी नाही. नवरात्रौत्सवातहीदुर्गा मूर्ती आगमन व विसर्जन मिरवणुकीवर बंदी असणार आहे, तसेच दांडिया, गरबा, प्रसाद वाटपासाठी गर्दी करू नये, असे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे. शहरातील चारही पोलीस ठाण्यांत पोलिसांनी मंडळाच्या कार्यकर्त्यांची बैठक घेऊन याबाबत सूचना केल्या.

राजवाडा पोलीस ठाण्यात आज झालेल्या बैठकीला रामानंदनगर, ताराबाई रोड, शिवाजी पेठ, मंगळवार पेठ, संभाजीनगर, गुजरी, टिंबर मार्केट परिसरातील मंडळांचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. पोलीस निरीक्षक प्रमोद जाधव यांना जिल्हाधिकाऱ्यांनी केलेल्या सूचनांचे काटेकोर पालन करणे सर्वांना बंधनकारक असल्याचे सांगितले. दरम्यान, लक्ष्मीपुरी पोलीस ठाण्यातही या अनुषंघाने बैठक पार पडली. यावेळी लक्ष्मीपुरी, उत्तरेश्वर पेठ, सोमवार पेठ, शनिवार पेठेतील तालीम संस्थांचे पदाधिकारी उपस्थित होते.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER