नवरात्र प्रारंभ, पारंपरिक पद्धतीने झाली घटस्थापना

Devi Temple

१) आई जगदंबेचे शक्तिस्वरूप शारदीय नवरात्रोत्सव आज प्रारंभ झाले.

२) हा उत्सव नऊ  दिवस उत्साहात साजरा होतो.

३) नवरात्रोत्सवासाठी महाराष्ट्रातील देवीची मंदिरे सजली आहेत.

४) जगदंबेची राज्यातील साडेतीन शक्तिपीठे प्रसिद्ध आहेत.

५) कोल्हापूरची महालक्ष्मी, तुळजापूरची आई भवानी आणि माहूरची रेणुका ही तीन पूर्ण शक्तिपीठे  आहेत.

६) नाशिकच्या सप्तशृंगी देवीचा मान अर्ध्या शक्तिपीठाचा आहे.

७ ) नवरात्रात देवीच्या सर्व मंदिरांत भक्तांची गर्दी असते.

८) सध्या कोरोनाच्या साथीमुळे मंदिरे बंद आहेत.

९) भक्त मंदिराच्या बाहेरून दर्शन घेत आहेत.

१०) घटस्थापनेमुळे मंदिरांमध्ये चैतन्य आले आहे.

११) मंदिर बंद असल्याने, मंदिर परिसरातील पूजा साहित्य विक्रेते व अन्य लहान दुकानदार आर्थिक संकटात सापडले आहेत.

१२) मंदिरात प्रवेशबंदी असल्याने देवीच्या ऑनलाईन दर्शनाची व्यवस्था करण्यात आली आहे.

१३) देवस्थानच्या फेसबुकवर आणि यूट्यूबवरही देवीचे दर्शन करता येईल.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER