उच्च न्यायालयाच्या निकालाविरुद्ध सर्वोच्च न्यायालयात दाद मागणार : नवनीत राणा

Navneet Rana - Maharashtra Today

माननीय मुंबई उच्च न्यायालयाचा आदर आहे; पण निकालाविरुद्ध सर्वोच्च न्यायालयात दाद मागणार, माननीय न्यायालयाने या निकालास सहा आठवड्यांची स्थगिती दिली आहे. सर्वोच्च न्यायालयाला सुटी असल्यामुळे आपल्या वकिलांच्या मागणीचा न्यायालयाने विचार केला. या आधी सर्वोच्च न्यायालयाच्या अधीन असणाऱ्या जातपडताळणी समितीने माझे जात प्रमाणपत्र तीन वेळा पूर्ण छाननी करून वैध असल्याचा अहवाल सादर केला होता.

माननीय उच्च न्यायालयाने आज जो निर्णय दिला आहे त्याचा आदर करून घटनादत्त अधिकाराचा पूर्ण वापर करून माझी सत्य भूमिका माननीय सर्वोच्च न्यायालयात जाऊन आपण दाद मागणार आहोत. न्यायदेवतेवर आपला पूर्ण विश्वास असून सर्वोच्च न्यायालयाच्या अखत्यारीत असणाऱ्या जात प्रमाणपत्र पडताळणी समिती, जिला कायदेशीरदृष्ट्या पूर्ण मान्यता व अधिकार आहेत अशा न्यायिक समितीने आपल्या सर्व कागदपत्रांची सखोल चौकशी केली व या चौकशीच्या आधारावर आढळलेल्या तथ्यांच्या आधारे सदर जात पडताळणी समितीने माझे जात पडताळणी प्रमाणपत्र वैध असल्याचा या आधी तीन वेळा निर्वाळा दिला आहे.

आजच्या निकालाचा संपूर्ण सन्मान करून कुठल्याही पद्धतीने विचलित न होता न्यायदेवतेवर संपूर्णपणे विश्वास ठेवून आपली बाजू सत्य आहे हे या ठिकाणी नमूद करावेसे वाटते. माननीय न्यायालयाच्या आदेशाची प्रत अजून आपल्याला मिळाली नसून आदरणीय न्यायमूर्तींनी काय निर्वाळा दिला हे अजून विस्तृतपणे आपण वाचले नाही. निकालाची प्रत मिळाल्यानंतर आपण या निर्णयाविरुद्ध सर्वोच्च न्यायालयात दाद मागणार आहोत. माझे वकील ज्येष्ठ विधिज्ञ ढाकेपालकर व ऍड. गाडे यांनी या निर्णयाविरोधात सर्वोच्च न्यायालयात अपील करण्यासाठी आठ आठवड्यांचा वेळ मागितला होता; कारण सध्या सर्वोच्च न्यायालयाच्या सुट्या सुरू आहेत. माननीय न्यायमूर्तींनी त्यांचे म्हणणे ग्राह्य धरून या निकालाला सहा आठवड्यांची स्थगिती दिली आहे व सर्वोच्च न्यायालयात निश्चितपणे माझी बाजू सत्य असल्याचे सिद्ध होईल. जनतेने आपल्याला खासदार म्हणून लोकशाही पद्धतीने निवडून दिले असून आपले जनसेवेचे व्रत अखंडपणे सुरूच राहणार आहे. गेल्या आठ वर्षांपासून अमरावती जिल्ह्यातील नागरिकांच्या सेवेत आपण अविरतपणे झटत असून खासदार म्हणून गेल्या दोन वर्षांत आपण आपल्या जिल्ह्याचे, शेतकरी, शेतमजूर,गोरगरीब, व्यापारी व महिला-विद्यार्थी यांच्या हिताचे अनेक प्रश्न लोकसभेत पोटतिडकीने मांडले.

कोरोनाकाळात आपण जिल्ह्यातील लाखो लोकांची अहोरात्र सेवा केली, अनेकांना मदतीचा हात दिला, अमरावती जिल्ह्याच्या विकासात शून्य योगदान असणारे माजी खासदार आनंदराव अडसूळ यांनी जिल्ह्याच्या विकासाच्या आड येऊन एक महिला म्हणून मला त्रास देण्याचे, जिल्ह्याच्या विकासाला बाधा आणण्याचे व माझे खच्चीकरण करण्याचे काम केले असून हे एक राजकीय षडयंत्र आहे.मी संघर्ष करणारी महिला आहे. त्यामुळे सर्वोच्च न्यायालयाचा निकाल हा अंतिम असेल व तेथे सत्याचाच विजय होईल, असा माझा विश्वास आहे. पदाधिकारी, कार्यकर्ते, हितचिंतक-स्नेहीजन यांनी विचलित होऊ नये. जनसेवेचे आपले कार्य सुरूच राहील. प्रेषक-खासदार सौ. नवनीत रवी राणा

प्रेषक-खासदार सौ नवनीत रवी राणा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button