नवनीत राणांची प्रकृती खालावली; उपचारासाठी नागपूरहून मुंबईकडे रवाना

Navneet-Rana

नागपूर :- अमरावतीच्या खासदार नवनीत राणा (Navneet Rana) यांना मागील आठवड्यात कोरोनाची (Corona) लागण झाली. त्यांच्यावर अमरावतीच्या खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते. पण अस्वस्थ वाटत असल्यामुळे त्यांना नागपूरच्या (Nagpur) वोक्हार्ट हॉस्पिटलमध्ये हालविण्यात आले होते. मात्र डॉक्टरांनी केलेल्या उपचारांनंतरही प्रकृती खालावल्याने गुरुवारी त्यांना नागपुरातून मुंबईला (Mumbai) हलवण्यात आले आहे. त्यांना मुंबईला नेण्यासाठी विमानाची व्यवस्था न झाल्याने रस्तामार्गे नेण्यात आले.

मिळालेल्या माहितीनुसार, त्यांचा पुढील उपचार मुंबईच्या लीलावती रुग्णालयात होणार आहे. सध्या त्यांना श्वास घ्यायला त्रास होत असून त्यांच्या छातीत खूप दुखत असल्याची माहिती आहे. नवनीत राणा यांच्या प्रकृतीबाबत कार्यकर्त्यांनी चिंता व्यक्त केली आहे.

त्यांच्यासोबत त्यांचे पती, आमदार रवी राणा आहेत. रवी राणा यांच्यासह त्यांची दोन्ही मुले, सासू-सासऱ्यांसह कुटुंबातील १२ जणांना करोनाची लागण झाली आहे. या सर्वांवर उपाचर सुरू आहेत. नवनीत राणा यांच्या सासू-सासऱ्यांवरही वोकहार्ट रुग्णालयात उपचार सुरू असून मुलांवर घरीच अमरावतीला उपचार सुरू आहेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER