नवनीत राणा यांचे कोर्टाकडून जात प्रमाणपत्र रद्द; शिवसेना कार्यकर्त्यांचा जल्लोष

SHivsena - Maharashtra Today

अमरावती :- खासदार नवनीत राणा (Navneet Rana) यांचे जात प्रमाणपत्र हायकोर्टाने रद्द केले आहे. त्यांना २ लाख रुपयांचा दंडही ठोठावला आहे. आता त्यांची खासदारकी धोक्यात आली आहे. तर दुसरीकडे शिवसैनिकांनी जल्लोष करून ढोल-ताशे वाजविले व फटाक्यांची आतषबाजी केली.

मुंबई हायकोर्टाने (Bombay High Court) खासदार नवनीत यांचे जात प्रमाणपत्र रद्द करण्याचा निर्णय जाहीर केला. माजी खासदार आनंदराव अडसूळ यांनी नवनीत राणा यांचे जात प्रमाणपत्र बोगस असल्याचा दावा करून न्यायालयात धाव घेतली होती. त्यामुळे कोर्टात हा निकाल दिला. मात्र, याचा अमरावतीत शिवसैनिकांनी जल्लोष केला आणि दुसरीकडे राणा यांच्या समर्थकांनमध्ये सन्नाटा पसरला आहे.

बऱ्याच जात पडताळणीची प्रकरणे प्रलंबित असताना अचानकपणे हा निकाल आल्याने अनेक तर्कवितर्क लावण्यात येत आहेत. दोन वर्षांपासून प्रलंबित असलेला निकाल न्यायालयाने दिल्यानंतर शिवसैनिकांमध्ये मोठ्या उत्साहाचे वातावरण पाहायला मिळत आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button