आमदार रवी राणा कारागृहात तर नवनीत राणा यांचे कारागृहासमोर धरणे आंदोलन

Ravi Rana-Navneet rana

अमरावती :- शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी अमरावतीत बडनेऱ्याचे आमदार रवी राणा (Ravi rana) यांना अटक करण्यात आली आहे.अतिवृष्टीमुळं नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना तातडीने मदत द्यावी, या मागणीसाठी राणा यांनी रास्ता रोको आंदोलन केले होते. त्यानंतर राणा यांना अमरावती पोलिसांनी अटक केली आहे. कालचा नरकचतुर्दशी आणि आजचा लक्ष्मीपूजनाचा दिवसही रवी राणा यांना कारागृहात काढावा लागणार आहे. पोलिसांच्या या कारवाईविरोधात रवी राणा यांच्या पत्नी खासदार नवनीत राणा (Navneet Rana) यांनी कारागृहाबाहेरच धरणं आंदोलन सुरू  केलं आहे.

ही बातमी पण वाचा : हेक्टरी ५० हजार नुकसानभरपाईसाठी शेतकऱ्यांचे आंदोलन; रवी राणांसह कार्यकर्त्यांना अटक

खासदार नवनीत राणा या आमदार रवी राणा यांना भेटण्यासाठी कारागृहात गेल्या होत्या. त्यावेळी त्यांना भेटण्याची परवानगी नाकारण्यात आली. त्यामुळे संतप्त झालेल्या नवनीत राणा यांनी कारागृहाबाहेरच धरणं आंदोलन करण्यास सुरुवात केली. यावेळी नवनीत राणा यांची पोलिसांसोबत बाचाबाचीही झाली. जोपर्यंत रवी राणा यांची भेट होणार नाही तोपर्यंत कारागृहाबाहेर धरणे आंदोलन सुरू राहणार, असा निर्धार नवनीत राणा यांनी केला. तर दुसरीकडे पोलिसांनी अटक केल्यानंतर आमदार रवी राणा यांनी कारागृहात अन्नत्याग आंदोलनास सुरुवात केली आहे.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER