उद्धव ठाकरेंनी संजय राऊतांकडून खासदारकीचा राजीनामा घ्यावा – नवनीत राणा

navneet-rana & Sanjay Raut

अमरावती : कंगना रनौत (Kangana Ranaut) प्रकरणावरून अमरावतीच्या खासदार नवनीत कौर राणा यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि शिवसेना नेते संजय राऊत (Sanjay Raut) यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे. राज्य सरकार सत्तेचा दुरुउपयोग करत असल्याचा आरोप करत कंगना रनौत यांच्या कार्यालयावरील मुंबई महापालिकेने केलेली कारवाई चुकीची असल्याचंही म्हटलं आहे.

त्या म्हणाल्या की, शिवसेना नेते संजय राऊत यांनी महिलांचा अपमान केला आहे. संजय राऊत यांनी महाराष्ट्र राज्याचा ठेका घेतला आहे का? ते वारंवार महिलांचा अपमान करत आहेत, आपली मर्यादा सांभाळा. तसेच, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा संजय राऊत यांना समर्थन आहे का? त्यांनी आता संजय राऊतांच्या खासदारकीचा राजीनामा मागायला पाहिजे, असेही नवनीत राणा म्हणाल्या.

राज्यात कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढतच चालली आहे. तर भंडारा-गोंदियामध्ये मोठ्या प्रमाणावर पूर आला. मात्र पूरग्रस्त भागात मुख्यमंत्री गेले नाही. आता मुख्यमंत्र्यांनी मातोश्रीच्या बाहेर निघायला हवे, असा टोलाही राणा यांनी लगावला.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER