नवनीत राणा यांचे जात प्रमाणपत्र हायकोर्टाकडून रद्द; खासदारकी धोक्यात

अमरावती :- अमरावतीच्या अपक्ष खासदार नवनीत राणा (Navneet Rana) यांचे जात प्रमाणपत्र हायकोर्टाने रद्द केले आहे. या निर्णयावरून त्यांना जोरदार झटका बसला असून त्यांची खासदारकी धोक्यात आली आहे. या प्रकरणी त्यांना २ लाख रुपयांचा दंडही ठोठावण्यात आला आहे. लोकसभेच्या निवडणुकीत त्यांनी शिवसेनेच्या (Shivsena) हेविवेट नेत्यांपैकी एक असलेल्या माजी खासदार आनंदराव अडसूळ (Anandrao Adsul) यांचा पराभव केला.

अमरावती लोकसभा मतदारसंघ (Amravati Lok Sabha constituency) हा अनुसूचीत जातींसाठी राखीव मतदार संघ होता. त्या मतदारसंघातून नवनीत राणा निवडून आल्या. त्यांच्या या निवडीवर आक्षेप घेताना आनंदराव अडसूळ यांनी हायकावतात दाद मागितली होती. अडसूळ यांच्या याचिकेवर सुनावणी करताना कोर्टाने नवनीत राणा यांचे जात प्रमाणपत्र अवैध असल्याचे सांगितले. त्यांना २ लाख रुपये दंड आणि ६ आठवड्यात सर्व प्रमाणपत्रक जमा करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

आनंदराव अडसूळ यांनी साल २०१७ मध्ये नवनीत राणा यांच्या जात प्रमाणपत्राबाबत याचिका दाखल केली होती. हायकोर्टाच्या या निर्णयानंतर आता त्यांची खासदारकी धोक्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. यामुळे कोर्टाने दिलेल्या ६ आठवड्यांच्या मुदतीत नवनीत राणा आपले जात प्रमाणपत्र सादर करणार का याकडे सर्वांचे लक्ष आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button