…तर तुम्ही एकमेकांना सोडा, नवनीत राणांचा महाविकास आघाडीतील पक्षांना सल्ला

अमरावती : महाविकास आघाडी (Mahavikas Aghadi) सरकारमध्ये औरंगाबादचे संभाजीनगर नामांतरावरून पुन्हा एकदा मतभेद समोर आले आहेत. त्यामुळे सरकारमध्ये वादंग निर्माण होण्याची शक्यता असून भाजपकडून (BJP) सरकारला कोंडीत पडण्याचा प्रयत्न केला जात आहे. अशातच आता अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांनी ठाकरे सरकावर (Thackeray Govt) जोरदार टीका केली आहे.

‘घरात जसं जावा आणि दिराचं भांडण असतं तसं सरकारचं सुरू आहे. जबरदस्तीने सरकारमध्ये राहणं आणि विचार न पटणं अशी अवस्था त्यांची झाली आहे, हे लोकांना स्पष्ट दिसत आहे. ‘विचार जमतं नसताना शिवसेना,काँग्रेस, राष्ट्रवादी पक्ष यांची युती झाली आहे. त्यामुळे विचार जमत नसेल तर तुम्ही एकमेकांना सोडा,’ असा सल्ला खासदार नवनीत राणा यांनी महाविकास आघाडीतील पक्षांना दिला आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजलाMT LIKE OUR PAGE FOOTER